"हम यहाँ सिर्फ बुर्ज खलिफा देखने आये है"; जाफरने केलं पीटरसनला ट्रोल | Wasim Jaffer Tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wasim-Jaffer-Pietersen

मुंबईकर वासिम जाफरने ट्वीट केला भन्नाट फोटो

"हम यहाँ सिर्फ बुर्ज खलिफा देखने आये है"; जाफरने केलं पीटरसनला ट्रोल

sakal_logo
By
विराज भागवत

NZ vs ENG, T20 World Cup: बलाढ्य इंग्लंडच्या संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत करून न्यूझीलंडने पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक मारली. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याच्या नाबाद ५१ धावांच्या खेळीमुळे संघाने १६६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली. पण डॅरेल मिचेलने नाबाद ७२ धावा काढत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याआधी केविन पीटरसनने एक ट्वीट केलं होतं. त्याला भारताचा माजी क्रिकेटर वासिम जाफर याने दमदार उत्तर देत ट्रोल केलं.

हेही वाचा: Video: भरमैदानात आफ्रिदीची 'ती' कृती.. भारतीय फॅन्सचा संताप!

"इंग्लंडचा संघ हा अतिशय बलाढ्य आहे. दुबईच्या जुन्या पिचवर सामने खेळवले जातात, म्हणून इंग्लंडला पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानचा संघ पराभूत करू शकतो. हीच स्पर्धा दुसरीकडे कुठे सुरू असती तर मात्र इंग्लंडला ही ट्रॉफी देऊन टाकावी लागली असती. ज्याप्रमाणे EPL ची ट्रॉफी म्हणजे चेल्सी हे समीकरण आहे. अगदी तसंच...", असं ट्वीट पीटरसनने केलं होतं. यावर वासिम जाफरने झकास ट्वीट केलं. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याचा फोटो वापरला आणि लिहिलं की, "आम्ही तर इथे फक्त बुर्ज खलिफाच बघायला आलोय"

हेही वाचा: "संघात ५ ओपनर कशाला हवेत?"; माजी क्रिकेटपटूचा तिखट सवाल

दरम्यान, इंग्लंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. मार्टिन गप्टीलला क्रिस वोक्सने अवघ्या 4 धावांवर तंबूत धाडले. केन विल्यमसनलाही त्याने 5 धावांवर बाद केले. ही जोडी माघारी फिरल्यानंतर डॅरेल मिशेलनं ड्वेन कॉन्वेच्या साथीनं संघाचा डाव सावरला. या जोडीनं 82 धावांची भागीदारी केली. त्यानंतर जिमी निशमने २७ धावांची तडाखेबाज खेळी केली. अखेर डॅरेल मिशेलने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला.

loading image
go to top