
Uganda Accident
ESakal
एका भीषण रस्ते अपघाताने युगांडा हा आफ्रिकन देश हादरला. बस आणि इतर वाहनांमध्ये झालेल्या धडकेत किमान ६३ जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. युगांडाची राजधानी कंपाला आणि राजधानीच्या उत्तरेकडील गुलू शहराला जोडणाऱ्या कंपाला-गुलू महामार्गावर बुधवारी सकाळी हा दुर्दैवी रस्ता अपघात घडला.