कॅलिफोर्नियात 72 तासांत 11 हजार विजा कोसळल्या; धुराचे लोट सॅटेलाईटमधूनही दिसले

टीम ई-सकाळ
Friday, 21 August 2020

कॅनिफोर्नियाच्या या आगीमध्ये सध्या वेगवेगळ्या 26 अगीच्या घटना घडल्या आहेत. त्यातील 23 ठिकाणी आगीची तीव्रता जास्त आहे. या आगीचा एकूण 2 लाख 26 हजार 100 एकर परिसराला फटका बसला आहे

America Northern California Fire 2020 : अमेरिकेतील उत्तर कॅलिफोर्नियात लागलेल्या आगीनं गेल्या चार दिवसांत रौद्र रूप धारण केलंय. आगीत जवळपास 30 हजार इमारती जळून खाक झाल्या असून, नैसर्गिक साधन संपत्तीचं आतोनात नुकसान झालंय. या आगीची तीव्रताच इतकी होती की, नासाच्या उपग्रहांमधूनही वणवा पेटल्याचं स्पष्ट दिसत होतं. अमेरिकेतील यूएस टुडेने दिलेल्या माहितीनुसार 72 तासांत कॅलिफोर्नियात 11 हजार विजा कोसळल्या आहेत. त्यानंतर वणवा पेटल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याचं यूएस टुडेनं म्हटलंय. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आणखी वाचा - अमेरिकेत आगीचं तांडवा; मुंबईपेक्षा मोठा परिसर जळून खाक

सगळीकडे धुराचे लोट
कॅनिफोर्नियाच्या या आगीमध्ये सध्या वेगवेगळ्या 26 अगीच्या घटना घडल्या आहेत. त्यातील 23 ठिकाणी आगीची तीव्रता जास्त आहे. या आगीचा एकूण 2 लाख 26 हजार 100 एकर परिसराला फटका बसला आहे. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, धुराचे लोट कित्येक किलोमीटवरून स्पष्ट दिसत आहेत. या धुरामुळं कॅनिफोर्निया आणि आजूबाजूच्या प्रांतातील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. 

नासाने पोस्ट केला व्हिडिओ
कॅलिफोर्नियाच्या आगीची तीव्रता इतकी गंभीर आहे की, नासाच्या उपग्रहावरून या आगीचा धूर स्पष्ट दिसत होता. नासाने या धुराचा एक छोटा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. या आगीमुळं लेक आणि नापा प्रांतातील नागरिकांनाही फटका बसण्याची शक्यता असल्याने त्यांना तातडीने परिसर सोडून जाण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कॅलिफोर्नियातील सोनामा प्रांतातील काही नागरिकांनाही परिसर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज, मोंटाना, ल्डाहो, उटाह आणि कोलोरॅडो परिसरात रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय.

USA 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: California Fire 2020 satellite images show wildfire smoke