Sunfish : कॅलिफोर्नियाच्या बीचवर दिसली एकावेळी ३० कोटी अंडी देणारी सनफिश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Giant Sunfish

कॅलिफोर्नियाच्या बीचवर दिसली एकावेळी ३० कोटी अंडी देणारी सनफिश

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील (California) लगुना बीचवर पॅडलबोर्डरने एका महाकाय सनफिशला (Sunfish) पोहताना बघितले. या माशाची नेमकी लांबी माहीत नाही. परंतु, पॅडलबोर्डची लांबी १४ फूट आहे. त्यामुळे चित्रांवरून काढलेल्या अंदाजानुसार सनफिश ९ ते १० फूट लांब असण्याची शक्यता आहे. सूर्यप्रकाश घेण्यासाठी पृष्ठभागावर बराच वेळ राहण्याची आवड असल्यामुळे या माशाला सनफिश म्हणतात. तसेच कॉमन मोला आणि मोला-मोला देखील म्हणतात. या माशाचा रंग तपकिरी, सोनेरी, पांढरा आणि राखाडी आहे.

लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, मादी सनफिश एकावेळी ३० कोटी अंडी देऊ शकते. कोणत्याही ज्ञात पृष्ठवंशीय प्रजातींपैकी ही सर्वांत मोठी आहे. ही सनफिश (Sunfish) मोठे चमकदार डोळे, मोठे डोके आणि लांब पंख यासाठी ओळखली जाते. पाण्याच्या पृष्ठभागावर (Water surface) तरंगताना तिला शार्क समजले जाते. ऑक्टोबरमध्ये पकडलेल्या या माशाची लांबी १०.५ फूट आणि वजन २००० किलो होते.

हेही वाचा: केनिया दुष्काळाच्या छायेत! मृत जिराफांची हृदयद्रावक छायाचित्रे समोर

२ डिसेंबरला दिसलेला राखाडी सनफिश (Sunfish) अतिशय शांत आणि अद्भुत होती. एक जर्मन आणि त्याचा मित्र मॅट व्हीटन लगुना बीचवर मासे पाहण्यासाठी गेले होते. समुद्रकिनाऱ्यावर (Beach) ते डॉल्फिन पाहण्याची आशा करीत होते. परंतु, ते बीचपासून ६०० फुटांवर पोहोचले तेव्हा त्यांना सनफिश दिसली. समुद्रातील प्रत्येक मोठा मासा या माशाला आपला शिकार बनवू शकत नाही. परंतु, समुद्रातील सी लाइन, किलर व्हेल आणि शार्क (Shark) तिचा शिकार करतात.

अनेक सनफिशच्या शरीरावर डाग देखील दिसतात. त्यामुळे ते कधीकधी दगडासारखे दिसतात. हे मासे प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरात अधिक आढळते. या माशाची शिकार केल्यानंतर जपान, कोरिया आदी देशांमध्ये पाठवले जाते. जेलीफिश स्क्विड आदी माशांना खाते. आहारात पोषक तत्त्वे कमी असतात. त्यामुळे जेलीफिशला अधिक अन्नाची आवश्यकता असते.

Web Title: California Sunfish Beach Water Surface

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :beachcalifornia
go to top