माझ्या तुरुंगातील कोठडीत-बाथरुममध्ये कॅमेरे लावण्यात आले होते- नवाझ शरिफांची मुलगी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 13 November 2020

पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझच्या Pakistan Muslim League-Nawaz (PML-N) उपाध्यक्ष मरयम नवाझ शरीफ Maryam Nawaz Sharif यांनी धक्कादायक आरोप केला आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझच्या Pakistan Muslim League-Nawaz (PML-N) उपाध्यक्ष मरयम नवाझ शरीफ Maryam Nawaz Sharif यांनी धक्कादायक आरोप केला आहे. इम्रान सरकारने त्यांच्या तुरुंगातील कोठडीत आणि बाथरुममध्ये कॅमेरे लावण्यात आल्याचं त्या म्हणाल्या आहेत. त्यांच्या या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 

जिओ न्यूजला गुरुवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खळबळजनक आरोप केला. त्यांना चौधरी शुगर मील प्रकरणी मागील वर्षी अटक करण्यात आली होती. यादरम्यान तुरुंगात असताना त्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागले असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. मी दोनदा तुरुंगात गेले, याकाळात एका महिलेला तुरुंगात मिळालेली वागणूक अत्यंत घृणास्पद होती. सरकार त्यांचे तोंड दाखवण्याच्याही लायकीची राहिली नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. 

Good News: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर; गोदरेजने ऑफर केलं सर्वांत स्वस्त लोन

मेहरम यांनी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ Tehreek-e-Insaf (PTI) सरकारवर टीका केली. एका पार्टीच्या उपाध्यक्षाला सरकार जर घरी येऊन त्यांच्या वडिलांसमोर अटक करत असेल आणि त्यांच्यावर पर्सनल अटॅक करत असेल तर पाकिस्तानमध्ये कोणतीही महिला सुरक्षित नाही. पाकिस्तान असो किंवा इतर कोठे महिला कमकुवत नाहीत, असंही मेहरम म्हणाल्या आहेत.  

दरम्यान, मागील वर्षी मेहरम यांना मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांना एनएबीने National Accountability Bureau कायद्याचे उल्लंघन करत अटक केल्याचा दावा त्यांनी केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cameras Were Installed In My Jail Cell Bathroom Maryam Nawaz Sharif