Good News: घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर; गोदरेजने ऑफर केलं सर्वांत स्वस्त लोन

 home loan godrej group
home loan godrej group

नवी दिल्ली: जर तुम्ही घर घेण्याची विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. सध्या बाजारात बऱ्याच वित्तीय संस्था गृहकर्जे देत आहेत. आता त्यासोबतच गोदरेज ग्रुपनेही वित्तीय सेवा क्षेत्रात पाऊल ठेवले असून तब्बल 1500 कोटींची गुंतवणूक केली आहे. आता गोदरेज हाऊसिंग फायनान्स कंपनीने देशातील सर्वात स्वस्त दरात गृहकर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
 
SBI पेक्षा स्वस्त गृहकर्ज-
गोदरेज कंपनी गृहकर्जांवर 6.69 टक्क्यांचा व्याजदर ठेवणार आहे. हा व्याजदर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर बँकापेक्षा कमी असणार आहे. सुरुवातीला कंपनीचे लक्ष्य हे समूहाच्या रिअल इस्टेट कंपनीकडून फ्लॅट खरेदी करणारे ग्राहक असतील. 

गोदरेज समूह आपल्या फायनान्स कंपनीमार्फत 6.69% दराने गृहकर्ज देईल, जे सध्या स्टेट बँक किंवा इतर कोणत्याही बँकेने दिलेल्या गृहकर्जाच्या दरापेक्षा कमी आहे. सुरुवातीला कंपनीचे लक्ष्य हे समूहाच्या रिअल इस्टेट (real estate company Godrej Properties) कंपनीकडून फ्लॅट खरेदी करणारे ग्राहक असतील. याबद्दल बोलताना गोदरेज हाऊसिंग फायनान्सचे अध्यक्ष पिरोजा गोद्रेज म्हणाले, 'आता आम्ही संपूर्ण धोरणासह नव्या व्यवसायात प्रवेश करत आहोत'.

गोदरेज हाऊसिंग फायनान्स सुरुवातीला मुंबई, दिल्ली, पुणे आणि बंगलुरु या शहरांमध्ये सुरु करण्यात येईल. या शहरांमध्ये देशातील अर्धे मार्केट आहे. त्यानंतर हे फायनान्स संपूर्ण देशात देण्यात येईल. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मनिश शहा म्हणाले की, ग्राहकांना स्वस्त आणि सहज कर्ज पुरवणे आमचे लक्ष्य असून 2021 पर्यंत 1 हजार कोटी रुपयांचा मार्केट मिळवण्याचा प्रयत्न असेल. तीन वर्षाच्या काळात 40,000 लोन अकाऊंट सुरु करण्याचे आमचे ध्येय असून ज्याची किंमत 10,000 कोटी रुपयांपर्यंत असेल.

सध्याच्या गृहकर्जांचे व्याजदर-
देशातील उर्वरित बँकांच्या व्याजदर पाहिले तर, युनियन बँक ऑफ इंडिया सध्या सर्वात स्वस्त गृहकर्ज देत आहे, जे 6.7% पासून सुरू होत आहे. तर स्टेट बँकेचे गृहकर्ज 6.95% पासून सुरू होते.


सध्याचे विविध बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर-

बँक                                     व्याजदर (टक्क्यांमध्ये)

Union Bank of India              6.70 - 7.15
Kotak Mahindra Bank           6.75-8.45
Indian Bank                          6.85-8.40
Bank of Baroda                    6.85- 8.70
Central Bank                        6.85 - 9.05
State Bank of India             6.95- 7.50

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com