'डिजनी' स्टार कॅमेरॉन बोयसचे 20 व्या वर्षी निधन

वृत्तसंस्था
रविवार, 7 जुलै 2019

- झोपेत असताना झाला मृत्यू.

- वयाच्या 20 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

मेलबर्न : प्रसिद्ध डिजनी स्टार कॅमेरॉन बोयस या अभिनेत्याचे वयाच्या 20 व्या वर्षी आज निधन झाले. बोयस याने आत्तापर्यंत अनेक भूमिका साकारल्या होत्या. 'डेसडेंट' आणि 'जेस्सी' यांसारख्या चित्रपटात आणि काही मालिकेत त्याने भूमिका बजावली होती. 

कॅमेरॉन याचा मृत्यू काल (शनिवार) सायंकाळी झोपेत असताना झाला. याबाबत बोयस याच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले, की कॅमेरॉनचा मृत्यू काल झाला. मात्र, आम्हाला आज सकाळी याबाबतची माहिती मिळाली. त्याचा मृत्यू झाल्याचे ऐकल्यानंतर आम्हाला धक्का बसला.

दरम्यान, कॅमेरॉन याची तब्बेत ठिक नसल्याने त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु होते. त्यातच त्याचा मृत्यू झाला. जगाने एक मोठा प्रकाश गमावला आहे. त्याचे कार्य नेहमी स्मरणात राहील, असे कॅमेरॉनच्या प्रवक्त्याने सांगितले.

'मिरर'मधील भूमिका प्रसिद्ध

बोयस या अमेरिकन अभिनेत्याचा जन्म 28 मे, 1999 झाला. मिरर, इगल आय, ग्राऊन अप्स आणि ग्राऊन अप्स 2 या चित्रपटातील त्याची भूमिका चांगलीच गाजली. 'जेस्सी' डिजनी चॅनेलवरील विनोदी मालिकेत त्यांची भूमिका महत्त्वाची होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cameron Boyce Disney Descendants star dies age 20