esakal | कॅनडा-सिंगापूरकडून भारताला मदतीचा हात; कोरोना लढ्यासाठी पाठवली मदत

बोलून बातमी शोधा

कॅनडा-सिंगापूरकडून भारताला मदतीचा हात; कोरोना लढ्यासाठी पाठवली मदत
कॅनडा-सिंगापूरकडून भारताला मदतीचा हात; कोरोना लढ्यासाठी पाठवली मदत
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : कोरोना महासंकटाशी लढा लढणाऱ्या भारताच्या मदतीसाठी कॅनडाने 10 मिलियन कॅनेडीयन डॉलर म्हणजेच जवळपास 60 कोटी रुपये पाठवण्याची घोषणा केली आहे. कॅडनाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी अशी घोषणा केलीय की, त्यांच्या सरकारद्वारे पाठवण्यात आलेले पैसे भारतासाठी एम्बुलन्स, पीपीई किट यांसारख्या अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी मदतगार ठरणार आहेत. रिपब्लिक ऑफ सिंगापूरकडून देखील मदतीची हात पुढे करण्यात आला आहे. भारतात सध्या रेकॉर्डब्रेक नवे रुग्ण सापडत आहेत. सध्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व असा ताण आहे.

ही रक्कम कॅनेडीयन रेड क्रॉसकडे दिली जाईल, जे इंडियन रेड क्रॉस सोसायटीला ट्रान्सफर करेल. जस्टीन ट्रुडो यांनी मंगळवारी म्हटलंय की, ही बाब अशी आहे की, ज्यामुळे प्रत्येक कॅनेडीयन नागरिक चिंतीत आहे. आम्ही हे जाणतो आम्हाला आपल्या मित्रांची मदत करावी लागेल.

कॅनडाच्या पंतप्रधानांनी म्हटलंय की, आम्ही कोणत्याही प्रकारची मदत करु शकतो आणि यासंदर्भात सातत्याने चर्चा सुरु आहे. दुसऱ्या बाजूला कॅनडामधून मदतीसाठी काही साहित्य पाठवण्याची तयारी केली जात आहे. यामध्ये ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, व्हेंटिलेटर आणि औषधे देखील सामील आहेत, जे कॅनडाच्या आपत्कालीन साठ्यामधून पाठवली जात आहेत.

रिपब्लिक ऑफ सिंगापूरचे दोन C 130 एअरक्राफ्ट पश्चिम बंगालच्या पानागढमध्ये लँड झाले आहेत. यामध्ये 256 ऑक्सिजन सिलिंडर आहेत. या ऑपरेशनमध्ये कॉन्टॅक्टलेस ऑफलोडिंग, फ्लाइट प्लॅनिंग आणि इतर ग्राउंड ऑपरेशन्सचा समावेश होता.