
ओटावा : पक्षांतर्गत नाराजीचा सामना करत असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिला. माझ्या नेतृत्वाबाबत सहकाऱ्यांनीच शंका घेतली असल्याने पुढील निवडणुकीत मी उमेदवार असण्याची शक्यता कमी आहे, असेही त्यांनी माध्यमांना सांगितले. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या अर्थमंत्र्यांनी अचानक राजीनामा दिल्याने मंत्रिमंडळात नाराजी असल्याचे स्पष्ट झाले होते. खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून भारतावर आरोप केल्याने ट्रुडो यांचे नाव भारतात चर्चेत आले होते. तसेच, भारताशी संबंध दुरावल्यानेही कॅनडातील अनेक नेत्यांनी ट्रुडो यांच्यावर टीका केली होती.