Canada: हरदीप सिंग निज्जर हत्येप्रकरणी कॅनडाची मोठी कारवाई; तीन भारतीयांना अटक

Khalistani terrorist Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी तीन भारतीयांना अटक केली आहे.
Canadian Police
Canadian Police

ओहिओ- खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येप्रकरणी कॅनडा पोलिसांनी तीन भारतीयांना अटक केली आहे. निज्जर याची काही महिन्यांपूर्वी कॅनडामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कॅनडा सरकारने भारतावर आरोप केले होते. त्यामुळे भारत आणि कॅनडामध्ये तणाव निर्माण झाला होता.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी याप्रकरणी भारतावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला होता. भारताने मात्र कॅनडाने केलेले आरोप फेटाळून लावले होते. शिवाय, याप्रकरणी काही पुरावे सादर करावे असं भारतानं म्हटलं होतं. आता तिघांना अटक झाल्याने याप्रकरणाला काय वळण मिळतं हे पाहावं लागणार आहे.

Canadian Police
Nashik News : ‘मॉडेल रोड’साठी 2025 पर्यंत एकेरी वाहतूक! सीबीएस ते कॅनडा कॉर्नर वाहतूक मार्गात बदल

कॅनडा पोलिसांनी करण ब्रार ( वय २२), कमलप्रीत सिंग (वय २२) आणि करणप्रित सिंग (२८) या तीन भारतीयांना अटक केली आहे. तिघे तीन ते चार वर्षांपासून अल्बर्टा येथे राहात होते. पोलीस अधिकारी मंदीप मूकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपींचे फोटो जारी करण्यात आले आहेत. कोर्टाच्या डॉक्युमेंटनुसार तिघांविरोधात हत्या आणि कट रचण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितलं की, 'तिन्ही आरोपींना ते पूर्वी ओळखत नव्हते. आरोपी आणि भारत सरकारचा काही संबंध आहे का? याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं होतं.' निज्जर हा भारत सरकारच्या मोस्ट वॉटेंड लिस्टमध्ये होता. त्याची कॅनडातील एका गुरुद्वाराबाहेर १८ जून २०२३ रोजी हत्या झाली होती. या मुद्द्यावरुन दोन्ही देशांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. दोन्ही देशांनी आपल्या देशातील राजदुतांची हकालपट्टी केली होती.

Canadian Police
ब्रिटनमध्ये केला करोडोंचा घोटाळा; आता भारतात मांडून बसलाय ठाण; वाचा काय आहे कॅनडा कनेक्शन?

कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेल्या आरोपामुळे रान उठले होते. त्यानंतर अमेरिकेने देखील भारताकडे बोट केल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. अमेरिक नागरिक आणि खलिस्तानी नागरिक गुरपतवत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप एका भारतीय अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला आहे. यावरुन अमेरिकेने भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com