
'आमच्यावरचे बलात्कार थांबवा'; कपडे काढत युक्रेनी महिला रेड कार्पेटवरंच घुसली
फ्रान्स : चित्रपट क्षेत्रात जगभरात महत्त्वाचा मानला जाणारा आंतरराष्ट्रीय कांस चित्रपट महोत्सव फ्रान्समध्ये सुरू आहे. जगभरातील महत्त्वाच्या आणि चांगल्या चित्रपटाचे प्रदर्शन यावेळी केले जाते. यावर्षीचा हा महोत्सव १७ मे ते २८ मे दरम्यान आयोजित केला आहे. यावेळी चित्रपट प्रदर्शित झालेल्या कलाकारांना रेड कार्पेट वरून चालण्याचा मान मिळतो. यावेळी जॉर्ज मिलर यांच्या Three Thousand Years of Longing या चित्रपटाचं प्रदर्शन सुरू असताना रेड कार्पेटवर एका महिलेने आंदोलन करून व्यत्यय आणला आहे.
हेही वाचा: नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध; मनी लाँडरिंगप्रकरणात कोर्टाचं निरीक्षण
फ्रान्समधील कान्समध्ये सुरू असलेल्या महोत्सवात शुक्रवारी Three Thousand Years of Longing या चित्रपटाचे स्क्रिनिंग चालू होते. या चित्रपटात इड्रिस इल्बा, टिल्डा स्विंटन यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन सुरू असताना एक महिला रेड कार्पेटमध्ये घुसली आणि आरडाओरड करू लागली. तीच्या शरीरावर कपडे नव्हते. तीने शरीर युक्रेनच्या झेंड्याच्या रंगाने रंगवले होते. ती महिला अनोळखी असून तीने आरडाओरड केल्यावर तीला सुरक्षारक्षकांनी तात्काळ बाहेर काढले. त्यानंतर दिग्दर्शक जॉर्ज मिलर, टिल्डा स्विंटन, इड्रिस इल्बा आणि त्याची पत्नी सबरीना इल्बा यांनी रेड कार्पेटवरून प्रवेश केला.
हेही वाचा: पवारांचं नवं राजकीय समीकरण? पुण्यात आज ब्राह्मण समाजासोबत बैठक
दरम्यान चित्रपट प्रदर्शनावेळी Three Thousand Years of Longing या चित्रपटाचे कलाकार रेड कार्पेटवरून चालत येत असताना एक अनोळखी महिलेने रेड कार्पेटवर प्रवेश केला आणि गुडघ्यावर बसली. तीने आपल्या शरीरावर खूप कमी कपडे घातले होते. तीने आपले शरीर युक्रेनच्या झेंड्याच्या रंगाने रंगवले होते. तीने आपल्या शरीराच्या वरच्या भागावर "Stop Rapping Us" असं लिहिलं होतं. तीने आपल्या शरीराच्या खालच्या भागावर हाताचे लाल रंगाचे ठसेही छापले होते. तसेच तीने पाठीच्या खालच्या बाजूला SCAM असं लिहिलं होतं.
युक्रेनमधील लैंगिक हिंसाचाराच्या विरोधात ही महिला आंदोलन करत होती. त्यानंतर लगेच सुरक्षारक्षकांनी तीचे शरीर झाकत तीला बाहेर नेले आणि पुढील कार्यक्रम पार पडला.
Web Title: Cannes Film Festival 2022 Disturbed Women Protest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..