BAPS Mandir Open For All: अबुधाबीमधील हिंदू मंदिर भाविकांसाठी खुलं; टाईट ड्रेस, टी-शर्ट घालून जाण्यावर बंदी.. काय आहेत नियम?

BAPS Mandir Open For All: अबुधाबीमधील हिंदू मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना मान, कोपर आणि घोट्यांवरील शरीराचा भाग झाकून ठेवावा लागेल, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर टोपी, टी-शर्ट, जीन्सला परवानगी नाकारण्यात आली आहे.
BAPS Mandir Open For All
BAPS Mandir Open For AllEsakal

BAPS Mandir Open For All: संयुक्त अरब अमिराती (UAE) अबुधाबी, येथील पहिले हिंदू मंदिर काल (शुक्रवारी) सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 फेब्रुवारी रोजी अबू धाबीच्या या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले होते. मंदिर व्यवस्थापनाने आपल्या वेबसाइटवर भाविक आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये ड्रेस कोडपासून फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीपर्यंतचे नियम समजावून सांगितले आहेत.

मंदिराच्या वेबसाइटवर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, टी-शर्ट, कॅप आणि घट्ट कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना मान, कोपर आणि घोट्यांमधील शरीराचा भाग झाकून ठेवावा लागेल, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर आक्षेपार्ह डिझाइन असलेल्या टोपी, टी-शर्ट आणि इतर कपड्यांना परवानगी नाही. जाळी किंवा सी-थ्रू आणि फिटिंग कपडे घालू नका असेही नमूद करण्यात आले आहे.

BAPS Mandir Open For All
Pakistan Lashkar Terrorist: मोठी बातमी! भारताचा आणखीन एक शत्रू पाकिस्तानात ठार; 'हा' लष्कर दहशतवादी होता '26/11'चा मास्टरमाइंड

पाळीव प्राण्यांनाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. याशिवाय मंदिर परिसरात बाहेरील खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच, मंदिर परिसरात ड्रोन कॅमेरे किंवा ड्रोनला सक्त मनाई आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार मंगळवार ते रविवार सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत मंदिरे उघडी राहतील. दर सोमवारी मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे.

BAPS Mandir Open For All
Iran Election : इराणमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान; दोन मोठ्या आंदोलनानंतर विद्यमान सरकारचं भवितव्य मतपेटीत बंद

दुबई-अबू धाबी शेख झायेद महामार्गावरील अल रहबाजवळ २७ एकर परिसरात सुमारे ७०० कोटी रुपये खर्चून हे मंदिर बांधण्यात आले आहे. मंदिरासाठी जमीन यूएई सरकारने दान केली आहे. हे मंदिर नगर शैलीत बांधण्यात आले आहे. तसेच अयोध्येत राम मंदिर बांधले आहे. मंदिरातील स्वयंसेवक उमेश राजा यांच्या म्हणण्यानुसार, 20 हजार टनांहून अधिक चुनखडीचे तुकडे राजस्थानमध्ये कोरले गेले आणि 700 कंटेनरमध्ये अबुधाबीला आणले गेले.

बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था यांनी सोशल मिडीया (BAPS) 'X' पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे, या पोस्टमध्ये लिहलं आहे की, "प्रतीक्षा संपली! अबुधाबीचे मंदिर आता सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे." हे मंदिर सोमवार वगळता सर्व दिवस सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

BAPS Mandir Open For All
ब्रिटनमध्ये केला करोडोंचा घोटाळा; आता भारतात मांडून बसलाय ठाण; वाचा काय आहे कॅनडा कनेक्शन?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com