टायटॅनिकचा अपघात झाला त्यादिवशीच कॅप्टनने 'लाइफबोट ड्रिल' रद्द केलेलं

टायटॅनिकचा अपघात झाला त्यादिवशीच कॅप्टनने 'लाइफबोट ड्रिल' रद्द केलेलं

मुंबईः  टायटॅनिक, एक असं जहाज ज्याबद्दल आम्हाला माहित नाही किंवा टायटॅनिक म्हणजे काय? असं बोलणारे क्वचितच सापडतील. मात्र टायटॅनिक जहाजाबाबत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या अनेक नागरिकांना आजही माहित नाहीत. खरंतर टायटॅनिक सिनेमा आल्यानंतर टायटॅनिक जहाजाबाबत लोकांना जास्त माहिती झाली. 

अशी माहिती आहे की, ज्यावेळी टायटॅनिक जहाज हिमनगाला ज्या दिवशी आदळलं त्या आधी या जहाजावर नित्याने होणारं 'लाइफबोट ड्रिल' घेतलं गेलं नव्हतं. खरंतर त्यावेळी जेव्हा मोठी जहाजे प्रवासास निघायची तेव्हा त्या जहाजांवर दर आठवडल्याला 'लाइफबोट ड्रिल' घेतले जात असे. ही त्यावेळची नित्याची प्रक्रिया होती. टायटॅनिकवर देखील असे ड्रिल्स व्हायचे. सर्व कर्मचारी या ड्रिलमध्ये सहभाग घ्यायचे. मात्र तोच १४ एप्रिलचा रविवार वगळता. हो ही तीच तारीख ज्या रात्री टायटॅनिक हिमनगाला आदळले होते.   
 
१४ एप्रिलच्या सकाळी RMS टायटॅनिकचा सर्व क्रू नित्याच्या 'लाइफबोट ड्रिल' होईल या अपेक्षेत होता. आधीच नमूद केल्याप्रमाणे त्यावेळी हे ड्रिल्स घेतले जाणे नित्याचे होते. आपल्यासमोर येऊ शकणाऱ्या मात्र कधीही असे प्रसंग कुणावरच ओढवू नयेत अशा कठीण परिस्थितीचा आधीच विचार करून स्वतःला आणि जहाजातील प्रवाशांना तयार ठेवणे हे साहजिकच अतिशय महत्त्वाचे होते.

मात्र, कायम होणारं 'लाइफबोट ड्रिल' त्या दिवशी अनपेक्षितपणे रद्द करण्यात आलेलं. धक्कादायक बाब म्हणजे याबाबतचा निर्णय जहाजाचे कॅप्टन स्वतः एडवर्ड जॉन स्मिथ यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आलेला. आता त्यांनी हा निर्णय का घेतला किंवा नित्याचे लाईफबोट ड्रिल रद्द करण्यामागे काय उद्देश होता हे कारण अद्याप कुणालाही समजलेले नाही.

खरंतर टायटॅनिक जहाज हे समुद्रातील ज्या परिसरातून होते त्या परिसरात असे अनेक हिमनग आहेत हे टायटॅनिकला आधीच माहित होते. त्या भागातून पुढे मार्गस्थ झालेल्या जहाजांकडून तशा धोक्याच्या सूचना टायटॅनिकला मिळाल्या होत्या. मात्र तरीदेखील लाइफबोट ड्रिल रद्द करणे म्हणजे खरंच चमत्कारिक निर्णय असल्याचं मानलं जातंय. 

१४ एप्रिलच्या रात्री टायटॅनिक सारखे बलाढ्य जहाज, त्यावेळचं सर्वात मोठं जहाज हिमनगाला आदळल्याने समुद्रात प्रचंड मोठा अपघात घडला होता. या अपघातामुळे अजस्त्र असं टायटॅनिक जहाजाने समुद्रात समाधी तर घेतली. या जहाजासोबत जहाजावरील तब्बल पंधराशे नागरिकांचा उत्तर अटलांटिक समुद्राच्या बर्फासारख्या गार पाण्यात मृत्यू झाला होता. बरं लाइफबोट ड्रिल घेतलं असतं तरीही सर्व नागरिकांना खरंच वाचवता येऊ शकलं असतं का ? कारण टायटॅनिकवर केवळ एक तृतीयांश नागरिकांनाच वाचवण्या एवढ्या लाईफबोटी होत्या. मात्र जर लाइफबोट ड्रिल घेतलं गेलं असतं बोटीवरील अधिकांना वाचवता येऊ शकलं असतं. 

त्यामुळे पुढील वेळी तुम्ही कुठे जात असाल तेंव्हा सुरक्षेच्या सर्व यंत्रणा योग्य आहेत का? त्या योग्य प्रकारे नित्याने तपासल्या जातायत का हे आधीच विचारून घ्या, त्यांची खात्री पटवून घ्या. कारण टायटॅनिक प्रमाणे ज्या दिवशीआपल्याकडून आपल्या सुरक्षिततेबाबत दिरंगाई होईल, कदाचित त्या दिवशीच आपल्याला कोणत्यानाकोणत्या आपत्तीला सामोरे जावे लागू शकते. म्हणून आधीच काळजी घ्या.

Captain cancels lifeboat drill the same day Titanic crashes

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com