केईएममध्ये कोव्हिशील्डच्या लसीचा 90 जणांना दुसरा डोस; लस लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध

भाग्यश्री भुवड
Sunday, 15 November 2020

मुंबईतील केईएम रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना लसीचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे

मुंबई : मुंबईतील केईएम रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना लसीचा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोव्हीशील्ड लसीवर केईएम रुग्णालयात चाचणी सुरू आहे. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 90 स्वयंसेवकांना कोव्हिशील्डचा लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. या स्वयंसेवकांवर डोस दिल्यानंतर 180 दिवस लक्ष ठेवले जाणार असून ते निरिक्षणाखाली राहणार आहेत. 

केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले कि, दुसऱ्या डोस मध्ये 101 पैकी 90 जणांना डोस देण्यात आला आहे. आता फक्त 11 जण उरले आहेत. ते 11 जण रुग्ण आहेत. ही ट्रायल प्रक्रिया आहे. उर्वरित 11 जणांची मंगळवार बुधवार पर्यंत संपून जाईल. मंगळवार पासून त्यांचा फॉलो अप सुरु होणार असल्याचे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले. 

कोविड सेंटर, रुग्णालयात डॉक्टर्स, रुग्णांची दिवाळी! कोरोना रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचा प्रयत्न

कोरोना लसीची चाचणी संपल्यानंतर कोणत्याही स्वयंसेवकांवर किंवा कोणताही दुष्परिणाम नसल्यास या लसीच्या प्रभावांची सखोल तपासणी केल्यावर ही लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होईल.  केईएम रुग्णालयात सध्या सुरू असलेल्या कोरोना साथीच्या आजारावर उपाय म्हणून तयार होणारी कोव्हीशील्ड लस तयार केली जात असून त्याची चाचणी मंगळवारी संपेल. लस चाचणीचा 180 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. प्रथम स्वयंसेवकाला लस दिल्यानंतर, दुसरा डोस 28 दिवसांनंतर दिला जातो. केईएम रुग्णालयात चाचणीचा पहिला टप्पा गेल्या महिन्यातच संपला होता, आता दुसरा डोस देण्याचे कामही मंगळवारपर्यंत संपेल. आतापर्यंत एकाही स्वयंसेवकांनी त्याचे वाईट परिणाम नोंदवले नसल्याचे डॉ. देशमुख म्हणाले.

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त ट्रेडिंगमध्येही; निर्देशांकांचा सर्वकालिक उच्चांक

चाचणी संपल्यानंतर दोन महिन्यांनंतर स्वयंसेवकांवर नजर ठेवली जाणार आहे. केईएमबरोबरच मुंबईतील सिरम इन्स्टिट्यूटच्या लसिच्या नायर येथे चाचण्या सुरू आहेत. नायर रुग्णालयात 125 स्वयंसेवकांची चाचणी येत्या 15 दिवसांच्या अखेरीस पूर्ण केली जात असल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ 
रमेश भारमल यांनी दिली. कोरोनाची लस यशस्वी चाचणी घेतल्यानंतर लवकरच सामान्य नागरिकांना दिली जाईल. देशातील 1600 स्वयंसेवकांवर सिरम संस्थेची चाचणी घेण्यात येत आहे.

 

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second dose of Covishield vaccine to 90 people in KEM