वाघिणीलाही मिळाला चक्क सोन्याचा सुळा!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

बर्लिन - सोन्याचे दात ही फक्त माणसांची मक्तेदारी नाही. जर्मनीच्या बर्लिन प्राणिसंग्रहालयातील ‘कारा’ नावाची बंगाली वाघीणही आता सोन्याचा दात तोंडात मिरवू लागली आहे. पिंजऱ्यात टाकलेले एक खेळणे चावताना ‘कारा’चा सुळा तुटला होता. या तुटलेल्या सुळ्याच्या बदल्यात डॉक्‍टरांनी तिला चक्क सोन्याचा सुळा लावला आहे!

इटलीतील तस्करांच्या तावडीतून ‘कारा’ची २०१३ मध्ये सुटका करण्यात आली होती. नंतर तिची रवानगी जर्मनीत बर्लिनला झाली. सुळा तुटल्यावर काय करावयाचे हा प्रश्‍न डेन्मार्कच्या दंततज्ज्ञांनी सोडवला आणि ‘कारा’वर सोन्याचा सुळा बसविण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. तीन आठवड्यांनंतर तिची प्रकृती पूर्वीप्रमाणे झाली आहे.

ही शस्त्रक्रिया दोन टप्प्यांत झाली. पहिल्या टप्प्यात, ऑगस्टमध्ये ‘कारा’च्या तुटलेल्या सुळ्याच्या जागी नवा दात बसविण्याची तयारी करण्यात आली. त्यासाठी दोन तास लागले. या महिन्यात प्रत्यक्ष सुळा बसविण्याचे काम करण्यात आले. हा सुळा एका विशेष प्रकारच्या डिंकाने बसविण्यात आला असून, तो ‘यूव्ही लाइट’ने लॉक करण्यात आला आहे. आता तो निघण्याची शक्‍यता नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या काळात ‘कारा’ला हाडे नसलेले मऊ मांस खाण्यास देण्यात आले होते. तिची प्रकृती आता उत्तम असल्याचे सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cara GOLD tooth implants