
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथोलिक पंथाचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस यांचे निधन झाल्यानंतर पुढील पोपची निवड करण्यासाठी व्हॅटिकन सिटीमध्ये आलेल्या जगभरातील निवडक कार्डिनलनी आज बैठक घेत पोप यांच्या दफनविधी कार्यक्रमाची आखणी केली. पोप फ्रान्सिस यांचा शनिवारी दफनविधी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून उद्यापासून (ता. २३) अखेरचे दर्शन करण्यासाठी त्यांचे पार्थिव सेंट पीटर्स बॅसिलिका येथे ठेवले जाणार आहे.