कार्ल मार्क्सच्या हस्तलिखीतांचा 5 लाख डॉलरला लिलाव

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

'दास कॅपीटल' या जगप्रसिद्ध ग्रंथाच्या हस्तलिखीतांचा तब्बल 5.23 लाख डॉलरना (3.34 दशलक्ष युआन) लिलाव करण्यात आला. 1850 ते 1853 या तीन वर्षाच्या काळात मार्क्स यांनी 1 हजार 250 पानी हस्तलिखीते लिहीली होती. त्यांनतर त्याचे 'दास कॅपीटल' ग्रंथामध्ये रुपांतर करण्यात आले. चिन मधील 'फेंग लुन' या उद्योगपतीने ही हस्तलिखीते लिलावासाठी उपलब्ध करून दिली.

बीजिंग : जगात सर्वात जास्त ज्यांचे साहित्य वाचले गेले आणि जाते असे जागतिक विचारवंत म्हणजे कार्ल मार्क्स. यांच्या 'दास कॅपीटल' या जगप्रसिद्ध ग्रंथाच्या हस्तलिखीतांचा तब्बल 5.23 लाख डॉलरना (3.34 दशलक्ष युआन) लिलाव करण्यात आला.

कार्ल मार्क्स यांची 200 वी जयंती निमित्ताने हा लिलाव करण्यात आला. 1850 ते 1853 या तीन वर्षाच्या काळात मार्क्स यांनी 1 हजार 250 पानी हस्तलिखीते लिहीली होती. त्यांनतर त्याचे 'दास कॅपीटल' ग्रंथामध्ये रुपांतर करण्यात आले. चिन मधील 'फेंग लुन' या उद्योगपतीने ही हस्तलिखीते लिलावासाठी उपलब्ध करून दिली. या ग्रंथाचे एकूण तीन खंड आहेत. त्यातील पहिला खंड 1867 मध्ये कार्ल मार्क्स यांच्या हयातील प्रसिद्ध झाला. 1883 मध्ये मार्क्स यांचा मृत्यू झाल्याने पुढील दोन खंड त्यांचा मित्र 'फ्रेडरिक एंगेल्स' आणि इतर सहकाऱ्यांनी मिळून प्रकाशीत केले. त्यातला दुसरा खंड 1885 आणि तिसरा 1894 मध्ये प्रकाशीत करण्यात आले. 19व्या शतकात या ग्रंथांमधील तत्त्वज्ञानाच्या आधारावर जगभरातील अनेक देशांमध्ये साम्यवादी राजवटींचा उदय झाला होता. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Carl Mark's Manuscripts auction $ 5 Million