Video: शानदार झेल घेणारी मांजर व्हायरल...

वृत्तसंस्था
Friday, 7 August 2020

एक मांजर शानदार झेल घेत असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी आपल्या ट्विटरवरून व्हिडिओ शेअर केला आहे.

सिडनी (ऑस्ट्रेलिया): एक मांजर शानदार झेल घेत असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी आपल्या ट्विटरवरून व्हिडिओ शेअर केला आहे.

वृद्ध दांपत्याचा किनाऱ्यावरील रोमँटिक डान्स व्हायरल...

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला गोल्फ क्लबने चेंडू मांजरीच्या दिशेने मारत आहे. मांजरीच्या मागे एक छोटासा नेटही आहे. मांजर प्रत्येक चेंडू शानदार पद्धतीने झेलत आहे. मांजरीने घेतलेले झेल पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. शिवाय, प्रतिक्रियांच्या माध्यमातून शानदार झेल घेणारी मांजर, सुपरस्टार क्रिकेटपटू... अशा प्रतिक्रिया नोंदवत आहेत. क्रिकेटपटूनंतर समालोचक बनलेल्या जोन्स यांनी लिहिले आहे की, "मी जगातील सर्वात खराब क्षेत्ररक्षक पाहिले आहेत. मी तुम्हाला खात्री देऊ शकतो." समालोचक हर्षा भोगले पण मांजरीने घेतलेल्या झेलाने प्रभावित झाले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटरवरून लिहिले की, "तो दुसरा झेल."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cat brilliant catch skills former australia cricketer dean jones tweets video