वृद्ध दांपत्याचा किनाऱ्यावरील रोमँटिक डान्स व्हायरल...

वृत्तसंस्था
Friday, 7 August 2020

कोरोना व्हायरसमुळे अनेकजण घरामध्ये अडकून पडले आहेत. निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येत नाही. पण, जगभरात परिस्थिती हळूहळू पुर्ववत होताना दिसत आहे.

न्यूयॉर्क (अमेरिका): कोरोना व्हायरसमुळे अनेकजण घरामध्ये अडकून पडले आहेत. निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटता येत नाही. पण, जगभरात परिस्थिती हळूहळू पुर्ववत होताना दिसत आहे. एका वृद्ध दांपत्याने समुद्र किनाऱयावर रोमँटिक म्युझिक सुरू असताना केलेला डान्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

मैत्रिणीला प्रपोज करण्यासाठी लावल्या मेणबत्या अन्...

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे समुद्रावर जाणे अवघड झाले आहे. अनेकजण समुद्राचे जुने फोटो आणि व्हिडीओ अपलोड करून मिस करत असल्याचे सोशल मीडियावर लिहीतात. पण, अमेरिकेतील हॉलिवूड अभिनेत्रीने एका वृद्ध दांपत्याचा किनाऱ्यावरील नृत्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांसमोर प्रेमाची साक्ष देत वृद्ध दांपत्य छान डान्स करत आहे. पाठीमागे रोमँटिक म्युझिक सुरू आहे. एकीकडे समुद्राच्या लाटा समुद्राचा किनारा गाठण्यासाठी उसळून येत आहेत तर दुसरीकडे हे दांपत्य आपले प्रेम डान्समधून व्यक्त करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लाखो नेटिझन्सनी व्हिडिओ पाहिला असून, प्रतिक्रियाही नोंदविल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सनी प्रेमाचे इमोजी पोस्ट करत नृत्याला दाद दिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I love, love ???? @ryanpv02 // TikTok

A post shared by Jessica Chastain (@jessicachastain) on

 

Video: युवती स्विमिंगदरम्यान गेली स्टंट करायला अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: grand couple danced romantically in sea video viral