Class 12 CBSE Exams Cancelled Abroad
Esakal
ग्लोबल
बारावी बोर्ड परीक्षेला आखाती युद्धाचा फटका, CBSEने ७ देशात परीक्षाच केली रद्द
CBSE 12th Board Exam Cancelled सीबीएसईकडून आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ७ देशात बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी स्थगित झालेल्या परीक्षाही रद्द केल्याचं सांगण्यात आलंय.
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सीबीएसईकडून घेण्यात येणाऱ्या १२ वी बोर्ड परीक्षेवरही झाला आहे. सीबीएसईकडून ७ देशांमधील बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत अदिकृत माहिती देण्यात आली असून सीबीएससी संलग्नित शाळांना १६ मार्च ते १० एप्रिल दरम्यान होणाऱ्या सर्व बारावीचे पेपर रद्द करण्यात आले आहेत. पश्चिम आशियातील ७ देशांसाठी सीबीएसईने हा निर्णय घेतलाय. CBSE Class 12 Exams Cancelled in Seven Countries Due to Security Concerns

