Ceasefire: एस. जयशंकर पहिल्यांदाच तालिबान सरकारशी बोलले; भारतीय रॉकेट हल्ल्याचा दावा लावला होता फेटाळून
एस. जयशंकर म्हणाले की, भारत आणि अफगाण लोकांमध्ये जुनी मैत्री आहे. या मैत्रिला पुन्हा उजाळा देण्याचं काम करण्यात आलं. पुढेसुध्दा अशीच मैत्री कायम ठेवण्यात येणार आहे.
S Jaishankar's One line message for PakistanEsakal
S. Jaishankar: भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी रात्री अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मावलवी आमिर खान मुत्ताकी यांच्याशी फोनवरुन बातचित केली. पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवल्यामुळे एस. जयशंकर यांनी त्यांचे आभार मानले.