'बाजारपेठ भारतात, नोकऱ्या मात्र चीनमध्ये', केंद्राने 'टेस्ला'ला फटकारलं

elon musks tesla in india government rejects tesla tax breaks demand
elon musks tesla in india government rejects tesla tax breaks demand

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीला भारत सरकारने चांगलंच फटकारलं आहे.

अमेरिकेतील इलेक्ट्रिक वाहनं बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेली टेस्ला जोपर्यंत भारतातील उत्पादन कार्यात सहभागी होत नाही, तोपर्यंत त्यांना सवलती दिल्या जाणार नाहीत, असं भारत सरकारने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय मंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी यासंदर्भात माहिती दिली. टेस्ला कंपनीची बाजारपेठ ही भारत आहे. मात्र, ते चीनमध्ये रोजगार निर्माण करतात. असं असू शकत नाही, हे गुर्जर यांनी स्पष्ट करत टेस्लाला खडे बोल सुनावले. (Centre on Tesla)

अवजड उद्योग राज्यमंत्र्यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली. कंपनीने सरकारच्या धोरणानुसार योजनांसाठी अद्याप अर्ज केलेला नाही, असं ते म्हणाले,जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला कंपनीला केंद्र सरकारने फटकारलं आहे. (Union Minister Krishan Pal Gurjar)

elon musks tesla in india government rejects tesla tax breaks demand
Oscar 2022 : जय भीम नव्हे तर या माहितीपटाची ऑस्करसाठी वर्णी

गेल्या वर्षी, टेस्ला या कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहनांवर आयात शुल्क कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, अवजड उद्योग मंत्रालयाने कंपनीला कोणत्याही कर सवलतीचा विचार करण्यापूर्वी देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करण्यास सांगितले. भारतात ऑटोमोबाईल आणि ऑटो इंडस्ट्रीसाठी मोठी बाजारपेठ आहे. याचसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रगत रसायनशास्त्र असलेल्या बॅटरींच्या निर्मितीसाठी आणखी वाव आहे.

केंद्र सरकारच्या यासंदर्भात स्वत:च्या मोठ्या योजना देखील आहेत. या दोन्हींसाठी आवश्यक योजना भारतीय आणि परदेशी कंपन्यांसाठीही खुल्या आहेत, असं मंत्री गुर्जर म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात टेस्ला कंपनीला इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी भारतीय बाजारपेठ हवी असेल, तर त्यांनी उत्पादन भारतात करावं, त्यासाठी आवश्यक संसाधनं पुरवली जातील, अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

elon musks tesla in india government rejects tesla tax breaks demand
किरीट सोमय्यांना धक्काबुक्कीची केंद्राकडून दखल; CISF अधिकारी पुण्यात दाखल

'कंपनीला चीनमधून कामगार हवे आहेत आणि भारताची बाजारपेठ हवी आहे. मोदी सरकारमध्ये हे शक्य नाही, असं केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केलं. आमच्या सरकारचं धोरण आहे की, भारतातील बाजारपेठेचा वापर करायचा असेल, तर नोकरीच्या संधी आणि रोजगारनिर्मिती भारतातच तयार व्हावी. यासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे.

सरकार टेस्लाला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी आमंत्रण देईल का, आणि देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला चालना देण्यासाठी पावलं उचलली जात आहेत का, या प्रश्नावर अवजड उद्योग राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी गे उत्तर दिलंय. काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी विचारलेल्या प्रश्नावर सरकारच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं.

चीनमध्ये नोकऱ्या आणि बाजारपेठ भारत! मोदी सरकारच्या काळात हे शक्य नाही. सरकारचे धोरण आहे की जर बाजार भारतात असेल, तर भारतातील लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. टेस्ला कंपनीने भारत सरकारच्या पॉलिसीनुसार अर्ज केलेला नाही. कंपनीसाठी भारताचे दरवाजे खुले आहेत. ते पॉलिसीनुसार अर्ज करू शकतात. भारतात कंपनी स्थापन करू शकतात, असं गुर्जर म्हणाले. आमच्या लोकांना नोकऱ्या द्या, सरकारचा महसूल वाढवा', असं मंत्र्यांनी म्हटलं.

संबंधित कंपनीने भारताच्या बाजारपेठेत रोजगार तयार करायला हवा. त्यांना चीनमध्ये रोजगार देऊन भारताची बाजारपेठ हवी असेल, तर हे मोदीजींच्या सरकारमध्ये शक्य नाही, असं गुर्जर म्हणाले. बाजारपेठ भारताची असेल तर भारतातील लोकांनाही रोजगार मिळाला पाहिजे. मोदीजींच्या सरकारचे हेच धोरण आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com