बायडेन यांच्यासमोर आव्हान प्रतिमा संवर्धनाचे

वृत्तसंस्था
Thursday, 19 November 2020

अनेक देशांबरोबर बिघडलेले संबंध पुन्हा सुरळीत करण्याचे कामही बायडेन यांना करावे लागणार आहे. तरच अमेरिकेचा दबदबा पुन्हा निर्माण होईल. याचबरोबर महासत्ता असल्याने इतर अनेक जबाबदाऱ्या बायडेन यांना पेलाव्या लागणार आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकेची जगभरात नाचक्की झाली, अशी टीका ज्यो बायडेन यांनी प्रचारादरम्यान केली होती. आता सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याने देशाच्या प्रतिमा संवर्धनाची जबाबदारी त्यांच्याच खांद्यांवर येऊन पडली आहे. त्यांनीही ही बाब पुरेशा गांभीर्याने घेऊन देशातील वरिष्ठ अधिकारी, गुप्तचर यंत्रणा आणि लष्कराशी संबंधित लोकांना त्यांचा मानसन्मान पुन्हा मिळवून देण्याचे काम प्राधान्यक्रमावर ठेवले आहे. इतर अनेक देशांबरोबर बिघडलेले संबंध पुन्हा सुरळीत करण्याचे कामही बायडेन यांना करावे लागणार आहे. तरच अमेरिकेचा दबदबा पुन्हा निर्माण होईल. याचबरोबर महासत्ता असल्याने इतर अनेक जबाबदाऱ्या बायडेन यांना पेलाव्या लागणार आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बायडेन यांच्याकडून जगाच्या अपेक्षा
पॅरिस पर्यावरण करारात पुन्हा एकदा सहभाग
जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा एकदा सहभाग
इराणबरोबरील वाद मिटवून आखाती प्रदेशात शांतता प्रस्थापित करणे
संहारक अस्त्रे कमी करण्याच्या करारासाठी रशियाला तयार करणे
लोकशाही देशांचे शिखर संमेलन बोलावून मानवाधिकारांचे हनन होत असलेल्या देशांना जाब विचारणे, हा मुद्दा चर्चेत आणणे
येमेनमधील यादवीपासून सौदी अरेबियाला दूर ठेवत सौदीच्या महत्त्वाकांक्षेला वेसण घालणे
चीन बरोबरचे व्यापार युद्ध संपुष्टात आणणे

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

खालील गोष्टी कायम राहणे शक्य
दक्षिण चिनी समुद्रात मुक्त संचारावरून चीन बरोबरील वाद
५ जी नेटवर्कवरील वर्चस्व
राशियावरील निर्बंध
उत्तर कोरियाला विरोध
इस्रायलला पाठबळ
विदेशातील सैन्य माघारीचे धोरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: challenge before Joe Biden