‘चँगई-५’ची चंद्राकडे झेप

पीटीआय
Wednesday, 25 November 2020

चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी चीनने आज मानवविरहित अवकाशमोहिम राबविताना चंद्राकडे अवकाशयान सोडले. अशा प्रकारची चीनही ही पहिलीच मोहिम आहे. चीनच्या ‘लाँग मार्च -५’ या प्रक्षेपकाद्वारे ‘चँगई-५’ हे यान वेनचँग प्रक्षेपण केंद्रावरून अवकाशात सोडले गेले. चीनची ही आतापर्यंतची सर्वांत गुंतागुंतीची अवकाशमोहिम असून चंद्रावरून नमुने आणण्यासाठीही गेल्या ४० वर्षातील पहिलीच मोहिम आहे.

बीजिंग - चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी चीनने आज मानवविरहित अवकाशमोहिम राबविताना चंद्राकडे अवकाशयान सोडले. अशा प्रकारची चीनही ही पहिलीच मोहिम आहे. चीनच्या ‘लाँग मार्च -५’ या प्रक्षेपकाद्वारे ‘चँगई-५’ हे यान वेनचँग प्रक्षेपण केंद्रावरून अवकाशात सोडले गेले. चीनची ही आतापर्यंतची सर्वांत गुंतागुंतीची अवकाशमोहिम असून चंद्रावरून नमुने आणण्यासाठीही गेल्या ४० वर्षातील पहिलीच मोहिम आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्दिष्ट्ये

 • चंद्राच्या उत्पत्ती, निर्मितीचा आणि भौगोलिक घटनांचा अभ्यास करणे
 • उड्डाण - २४ नोव्हेंबर
 • यान परतणार - डिसेंबरमध्ये

‘चँगई-५’ बद्दल

 • ऑर्बायटर(चंद्राभोवतील फिरणारे छोटे यान), लँडर, असेंडर आणि रिटर्नर यांचा समावेश
 • ८.२ टन - एकूण वजन
 • २० दिवस - एकूण मोहिम कालावधी

अशी असेल मोहीम

 • चांद्रकक्षेत प्रवेश केल्यावर लँडर आणि असेंडर हे ऑर्बिटर आणि रिटर्नर पासून वेगळे होतील. 
 • ऑर्बिटर आणि रिटर्नर चंद्राच्या पृष्ठभागापासून दोनशे किमी वर परिभ्रमण करतील
 • लँडर आणि असेंडर हे चंद्राच्या ईशान्य भागात ओशनस प्रोसिलॅरम येथे उतरतील
 • यानंतर ४८ तासांनी रोबोटिक हात बाहेर येऊन मातीचे नमुने, खडे गोळा करेल
 • जमिनीत छिद्रही पाडले जाईल
 • दोन किलो वजनाचे नमुने गोळा करणे अपेक्षित
 • असेंडर उड्डाण करून ऑर्बिटर आणि रिटर्नरला जोडले जाईल
 • नमुने रिटर्नरकडे दिल्यावर असेंडर पुन्हा वेगळे होईल
 • योग्य वेळी ऑर्बिटर आणि रिटर्नर पृथ्वीच्या दिशेने झेपावतील
 • चीनमधील इनर मंगोलिया स्वायत्त प्रदेशात लँडिंग

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: changai five satellite launch by china