अमेरिकेत १० वर्षात किती गोळीबाराच्या घटना घडल्या? प्रश्नावर उत्तर देताच थेट गळ्यावर झाडली गोळी; चार्ली किर्क यांची हत्या

Charlie Kirk Shot Dead : किर्क यांच्यावर गोळीबार झाला त्याआधी अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या घटनेचे व्हिडीओसुद्धा व्हायरल होत आहेत.
Charlie Kirk Shot Dead During Campus Event—A Look at 10 Years of Mass Shootings in the US

Charlie Kirk Shot Dead During Campus Event—A Look at 10 Years of Mass Shootings in the US

Esakal

Updated on

अमेरिकेतील कट्टर दक्षिणपंथीय कार्यकर्ते आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली किर्क यांची गोळी झाडून हत्या करण्यात आलीय. किर्क यांचं वय फक्त ३१ वर्षे इतकं होतं. त्यांच्यावर युटा व्हॅली युनिव्हर्सिटीतील एका कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला. यानंतर किर्क यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात त्यांच्यावर सर्जरीही केली गेली. पण त्यानंतर किर्क यांचा मृत्यू झाला. तरुणांच्या मनातला आवाज हरपल्याचं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी शोक व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com