चिमुकल्याचा श्वास रोखून ठेवणारा व्हिडिओ पाहा...

वृत्तसंस्था
Friday, 17 July 2020

एका चिमुकल्याचा श्वास रोखून ठेवणारा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उंचीवरून पडूनही मुलगा सुखरूप बचावला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बीजिंग (चीन): एका चिमुकल्याचा श्वास रोखून ठेवणारा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. उंचीवरून पडूनही मुलगा सुखरूप बचावला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Video: तहानलेल्या खारूताईने काय केले पाहा...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दोन वर्षांचा मुलगा साधारण 100 फूट उंचीवर असलेल्या बाल्कनीच्या टोकावर लटकलेला दिसत आहे. खिडकीतून तोल गेल्यामुळे तो खाली पडला. खिडीबाहेर असलेल्या स्लोपला त्याने घट्ट पकडून धरले आणि वाचवण्यासाठी ओरडू लागला. यावेळी खाली उभा असलेल्या युवकाने त्याला अलगद झेलले आणि जीव वाचवला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुलाच्या पालकांनी त्याला घरामध्ये ठेवून ते बाहेर गेले होते. पण, घराची खिडकी उघडीच होती. मुलगा खिडकीतून बाहेर आला आणि एअर कंडिशन ठेवलेल्या स्लोपवर अडकला. यामुळे तो घाबरून ओरडू लागला. खिडकीला पकडलेले हात सुटले आणि खाली पडणार एवढ्यात युवकाने त्याला झेलले. मुलाला कोणतीही दुखापत झालेली नाही पण उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Video: बाळाने उघडला तिसरा डोळा पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child falls down heart stopping moment video viral at china