Video: बाळाने उघडला तिसरा डोळा पण...

वृत्तसंस्था
Friday, 17 July 2020

एका बाळाला तिन डोळे असून, तिन्ही डोळ्यांची तो हालचाल करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, हा नेमका काय प्रकार आहे, हे समजत नाही.

बर्लिन (जर्मनी) : एका बाळाला तिन डोळे असून, तिन्ही डोळ्यांची तो हालचाल करताना दिसत आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, हा नेमका काय प्रकार आहे, हे समजत नाही.

मिरॅकल बेबी म्हणून तीन डोळे असलेल्या बाळाची ओळख सोशल मीडियावर आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका बाळाला तीन डोळे असल्याचे दिसत असून, तिन्ही डोळ्यांची हालचाल अगदी एकसारखी दिसत आहे. पण, व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल की, या मुलाच्या कपाळावर तिसरा डोळा आहे. ज्याची हालचाल इतर दोन डोळ्यांप्रमाणे होताना दिसत आहे. संबंधित व्हिडीओ जर्मनीमधी असल्याचे समजते. पण, गेल्या काही दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओ मागचे सत्य समोर आले.

एका व्हिडिओ एडिटरने हा व्हिडीओ एडिट केला आहे. व्हिडिओ एडिट करून एक डोळा कपाळावर लावला आहे. मोशन इफेक्ट देऊन तिसऱ्या डोळ्याची हालचाल इतर दोन डोळ्यांप्रमाणेच होत आहे. याआधीही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून भारतात व्हॉट्सअ‍ॅपवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केला जात आहे. पण, फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडीओ फेक असून, एडिट केल्याची माहिती पुढे आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fact check video of three eyed miracle baby going viral but its edited