

Chile Invites Indians to Explore Easter Island, Antarctica and New Business Opportunities
esakal
भारतापासून भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दूर असलेला देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिलीने भारतीय पर्यटक, उद्योजक आणि गुंतवणूकदारांना विविध क्षेत्रांतील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नैसर्गिक सौंदर्य, स्थिर अर्थव्यवस्था, खनिजसंपत्ती, शिक्षण आणि व्यापार या सर्व क्षेत्रांत सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे चिलीच्या प्रतिनिधींनी सांगितले. Gustavo Gonzalez (Consul General of Chile) यांनी BRICS परिषदांच्या पार्श्वभूमीवर AP Globale Digital ला मुलाखत दिली. अपर्णा प्रभूदेसाई यांनी ही मुलाखत घेतली.