Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

Ex Kazakh Minister Beating His Wife: संपूर्ण दिवस जोडप्याने रेस्टॉरंटमध्ये घालवले. पण, त्याच रात्री सलतनतला पतीकडून बेदम मारहाण झाली.
Saltanat Nukenova
Saltanat Nukenova

नवी दिल्ली- माणूस किती क्रूर होऊ शकतो याची प्रचिती अनेकदा येते. अशीच एक धक्कादायक घटना कझाकस्तानमध्ये घडली आहे. कझाकस्तानच्या माजी मंत्र्याने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करुन हत्या केली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. कझाकस्तानमध्ये हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ वर्षीय सलतनत नुकेनोवा (Saltanat Nukenova) मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तिच्या नवऱ्याच्या रेस्टॉरंटमध्ये मृत अवस्थेच आढळून आली होती. कुआंडिक बिशिंबेव (Kuandyk Bishimbayev) असं मृत महिलेच्या पतीचं नाव आहे. संपूर्ण दिवस जोडप्याने रेस्टॉरंटमध्ये घालवले. पण, त्याच रात्री सलतनतला पतीकडून बेदम मारहाण झाली.

Saltanat Nukenova
Cyber Crime: इंस्टाग्रामवर एक क्लिक अन् महिलेने गमावले 2.7 कोटी रुपये; काय आहे प्रकरण?

सुनावणीदरम्यान कोर्टाने रेस्टॉरंटमधील आठ तासांचे सीसीटीव्ही फूटेज पाहिले. यात ४४ वर्षीय कुआंडिक बिशिंबेव आपली पत्नी सलतनत हिला अत्यंत क्रूर अशी मारहाण करत असल्याचं दिसत आहे. आरोपी पती हा कझाकिस्तान सरकामध्ये महत्त्वाच्या पदावर राहिलेला आहे. काहीकाळ त्याच्याकडे अर्थमंत्रीपद देखील होतं.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, 'कुआंडिक आपल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारत आहे. त्यानंतर तिच्या केसांना पकडून फरफटत नेत आहे. सलतनत पतीच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करते आणि टॉयलेटमध्ये जाऊन लपते. पण, आरोपी पती टॉयलेटचा दरवाजा तोडतो आणि तिला खेचून बाहेर काढतो. तिचा गळा दाबला जातो. त्यानंतर ती बेशुद्ध होते. '

सलतनत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असती. त्यानंतर कुआंडिक १२ तासांनी अॅम्बुलन्सला फोन करतो. वैद्यकीय मदत आल्यानंतर सलतनतला मृत घोषित केलं जातं. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, सलतनतच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. तिच्या नाकाचे हाड मोडलेले होते. चेहऱ्यावर बऱ्याच जखमा झालेल्या होत्या. हात-पाय यांना मार लागलेला असतो.

Saltanat Nukenova
Crime News: ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त, निवडणुकीसाठी आणली होती रक्कम?

कुआंडिक याच्याविरोधात हत्येचा आणि आत्यंतिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संपूर्ण खटला लाईव्ह स्ट्रिम करण्यात आला होता. त्यामुळे देशभर हे प्रकरण गाजले. अनेक लोकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

एका श्रीमंत आणि प्रभावी घरातील व्यक्ती असा मोठा गुन्हा करु शकतात, कारण त्यांना माहिती असतं आपण यातून सुटू शकतो, अशी लोकांची प्रतिक्रिया आहे. याआधी कुआंडिक याला २०१७ मध्ये लाच घेतल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा झाली होती. पण, तो तीन वर्षातच तुरुंगाबाहेर आला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com