Crime News: ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त, निवडणुकीसाठी आणली होती रक्कम?

दीड कोटींपेक्षा ही रक्कम जास्त असल्याचा अंदाज निवडणूक विभागाने वर्तवला आहे | The Election Department has estimated that this amount is more than one and a half crores.
Crime News: ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त, निवडणुकीसाठी आणली होती रक्कम?
navi mumbai cash crimesakal

Mumbai Local News: निवडणूक विभागाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त केली. दुधाच्या टेम्पोतून ही रक्कम घेऊन जात होते. ठाणे आणि नवी मुंबईतील निवडणुकीकरिता ही रक्कम आणल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात आता चौथा आणि पाचव्या टप्प्यातील निवडणुका सुरु आहेत. ठाणे लोकसभेसाठी १३ मे तर मावळकरिता २० मे ला मतदान होत आहेत. दोन्ही मतदारसंघात उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. याकाळात पैसे वाटपाचे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक विभागातर्फे मुंबई सहित ठाणे आणि मावळ लोकसभा मतदार संघांत तपासणी मोहिम सुरू आहे.

.

Crime News: ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त, निवडणुकीसाठी आणली होती रक्कम?
Cyber Crime: इंस्टाग्रामवर एक क्लिक अन् महिलेने गमावले 2.7 कोटी रुपये; काय आहे प्रकरण?

याच अनुषंगने शुक्रवारी (ता.४) रात्री ११ च्या सुमारास ऐरोली खाडी पुलावरील नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर दुधाचा टेम्पोतून एक कोटी ६० लाखांची रक्कम आढळून आली. रात्री उशिरापर्यंत रोकड मोजण्याचे काम पथकामार्फत सुरू होते. त्यामुळे दीड कोटींपेक्षा ही रक्कम जास्त असल्याचा अंदाज निवडणूक विभागाने वर्तवला आहे.

दोघेजण ताब्यात

रक्कम घेऊन जाणाऱ्या वाहनांसोबत दोघांना निवडणूक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. वाहन आणि रक्कम सोडवण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन्ही परस्पर विरोधी नेत्यांकडून फोन येत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Crime News: ऐरोली खाडीपुलावर दीड कोटींची रोकड जप्त, निवडणुकीसाठी आणली होती रक्कम?
Navi Mumbai: समाधानकारक बातमी, रणरणत्या उन्हातही भाजीपाल्याचे दर स्थिर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com