China Accident : थंडीने केला घात! धुक्यामुळे चायनाच्या 200 वाहनांचा ब्रिजवरती अपघात

अपघातस्थळी अनेक लोक जखमी
China Accident
China Accident esakal

China Accident : अत्यंत धुक्यामुळे बुधवारी सकाळी चीनमधल्या हेनान राज्यातल्या झेंगझोउ शहरात एका पुलावर जवळजवळ 200 वाहन कोसळली, सोशल मीडियावरच्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये, अनेक कार आणि ट्रक एकमेकांना धडकतांना आणि झेंगझिन हुआंगे ब्रिजवर ढीग होताना दिसत आहे.

China Accident
Heart Health : निरोगी हृदयासाठी कसा असावा आहार ?

सीसीटीव्हीनुसार, अपघातस्थळी अनेक लोक जखमी झाले असून अग्निशमन दल त्यांना वाचवण्यासाठी तेथे आले आहेत. स्थानिक टेलिव्हिजननुसार,स्थानिक अग्निशमन विभागाने घटनास्थळी लगेच 11 अग्निशमन ट्रक आणि 66 अग्निशमन दलाचे कर्मचारी पाठवले असून, बचाव पथकाचा प्राथमिक अंदाज आहे की या अपघातात 200 हून अधिक वाहने अडकली असून जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.

China Accident
Chutney Recipe for Winter : थंडीत लाभदायक अशी कोथिंबीर आणि शेंगदाण्याची स्पेशल चटणी

चीनच्या लोकांनी हा व्हिडिओ ट्वीटरवर शेयर केला आहे. सुमारे 42 सेकंदाचा हा व्हीडिओ आहे, आणि हा व्हीडिओ काढणारा व्यक्ती खूप घाबरला आहे आणि म्हणतो आहे की, “मला नाही वाटत की आपण इथून जीवंत जाऊ शकतो”दरम्यान हे तिथे वाढलेल्या धुक्यामुळे झालं असावं असा अंदाज लावला जातो आहे, पण याच ठराविक कारण अद्याप स्पष्ट नाही. यानंतर झेंगझो ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकांना आणि वाहतूक पोलिसांना या पूलावरून जाण्यास बंदी घतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com