
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफ लागू केल्यानंतर चीननं प्रत्युत्तर दिलंय. चीनकडूनही अमेरिकन उत्पादनांवर अतिरिक्त टॅरिफ लागू केले जाणार आहे. चीनच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेच्या शेअर मार्केटवर झालाय. तज्ज्ञांच्या मते अमेरिकन शेअर बाजाराची अशी स्थिती कोरोना काळातच झाली होती. चीनने घोषणा केलीय की अमेरिकन उत्पादनांवर ३४ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला जाणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये जागतिक व्यापारयुद्ध वाढण्याची भीती निर्माण झालीय.