esakal | चीनची मुजोरी वाढली! BBC च्या प्रसारणावर घातली बंदी
sakal

बोलून बातमी शोधा

Q R code.

चीनने जगातील प्रसिद्ध मीडिया समुह संस्था बीबीसीच्या देशातील प्रसारणावर बंदी घातली आहे

चीनची मुजोरी वाढली! BBC च्या प्रसारणावर घातली बंदी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

बिजिंग- चीनने जगातील प्रसिद्ध मीडिया समुह संस्था बीबीसीच्या देशातील प्रसारणावर बंदी घातली आहे. चीन सरकारने आरोप केलाय की, बीबीसीने शिनजियांग प्रांत आणि कोविड-१९ महामारी संबंधी खूप साऱ्या खोट्या बातम्या पसरवल्या आहेत. त्यामुळे सरकारने बीबीसीवर बंदी घातल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही खोट्या बातम्या प्रसारित करण्याच्या पाऊलाला सहन केले जाणार नाही, असं सरकारकडून म्हणण्यात आलं आहे. चीनची सरकारी वृत्त संस्था ग्लोबल टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल शंभरीला पाच कमी, डिझेलसोबत शतकी भागीदारी

चीन सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हणण्यात आलंय की, बीबीसी वर्ल्ड न्यूजने (BBC World News)कंटेटसंबंधी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे सरकारी फिल्म, टीव्ही आणि रेडिओ प्रशासनाने (China Film, TV and Radio Administration) बीबीसीच्या प्रसारणाला दिलेली मंजुरी रोखली आहे. बीबीसीच्या वार्षिक मंजुरीची निवेदन चीनने नाकारले आहे. चीनच्या स्टेट फिल्म, टीव्ही आणि रेडिओ प्रशासनाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

चीनच्या सरकारी मीडियाने म्हटलं की बीबीसी वर्ल्ड न्यूजने प्रसारणाच्या अटी-नियमांचे गंभीर उल्लंघन केले आहे. अटी-नियमांमध्ये सांगण्यात आलंय की बातमी सत्य आणि योग्य पाहिजे. सोबतच बीबीसीचे कृत्य चीनच्या राष्ट्रीय हितांना बाधा पोहोचवणारे आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटेनने चीनच्या CGTN वर देशातील कायद्यांचे उल्लदं केल्याप्रकरणी लायसेन्स रद्द केले होते. त्यानंतर चीनचा बीबीसीवर बंदी घालण्याचा निर्णय आला आहे. चीनच्या या प्रत्युत्तरामुळे दोन्ही देशातील संबंधी अधिक बिघडणार आहेत. कधीकाळी ब्रिटेनची वसाहत असणाऱ्या हाँगकाँगमध्ये चीनने दबावतंत्र वापरले आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत.

बीबीसीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीन सरकारच्या या निर्णयामुळे आम्ही निराश झाला होता. यापूर्वीच बीबीसीवर देशात सेन्सॉरशीप लादली होती. बीबीसी जगातील सर्वाधिक विश्वासहार्य वृत्त संस्था आहे. जगभरातील रिपोर्टर यासाठी निष्पक्षपणे आणि भीतीविना काम करत असतात, असं बीबीसी प्रवक्ते म्हणाले आहेत. माध्यम स्वातंत्र्यावर हा घाला असल्याचं बीबीसीने म्हटलं आहे. चीन सरकारने याआधीच माध्यमांवर अनेक बंधने लादली आहेत. त्यांच्या या नव्या पाऊलामुळे चीनची जगभरातील प्रतिमा अधिक खराब होईल, असंही ते म्हणाले. दरम्यान, चीन सरकारच्या बीबीसीवर बंदी घालण्याच्या निर्णयावर जगभरातून टीका होताना दिसत आहे. 


 

loading image