चीनमुळे जगाचं खूप मोठं नुकसान; ट्रम्प यांचा पुन्हा हल्लाबोल

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 जुलै 2020

कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेकदा हल्लाबोल केला आहे. त्यांनी आज परत एकदा तिखट शब्दात चीनवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- कोरोना विषाणू पसरवल्याचा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेकदा हल्लाबोल केला आहे. त्यांनी आज परत एकदा तिखट शब्दात चीनवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोमवारी यासंदर्भात ट्विट केलं आहे. चीनने संयुक्त राष्ट्र अमेरिका आणि संपूर्ण जगाला खूप मोठे नुकसान पोहोचवलं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

चीनसोबत चर्चेसाठी भारताचा 'एकटा टायगर'; सैन्य मागे घेण्यास पाडलं भाग
कोरोना विषाणूने अमेरिकेत अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अमेरिकेत 29 लाखांच्या पुढे गेली आहे. सर्वाधिक रुग्णांच्या संख्येत अमेरिका जगात पहिल्या स्थानावर आहे. कोरानामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही अमेरिकेत मोठी आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख 32 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अनेक उपाययोजना करुनही अमेरिकेला कोरोनाला थोपवण्यात यश आलेलं नाही. याचा राग ट्रम्प यांनी चीनवर काढला आहे. चीनेने अमेरिकेचं आणि जगाचं खूप मोठं नुकसान केलं आहे, असं ते म्हणाले आहेत.   

यापूर्वी 5 जूलै रोजी देशाच्या 244 व्या स्वतंत्रता दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला लक्ष्य केले होते. चीनने ठेवलेली गोपनीयता, धोका आणि वस्तूस्थितीवर पडदा टाकल्याने कोरोना विषाणू सर्व जगभर पसरला. यासाठी चीन संपूर्णपणे जबाबदार आहे, असं ते म्हणाले होते.

चीनमधून विषाणू येण्याअगोदर अमेरिकेत सर्वकाही चांगलं सुरु होतं. अनेक देशांचा अमेरिकेमुळे फायदा झाला आहे. मात्र आता तो होणार नाही. अमेरिकेला आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर कर लावला जात आहे. त्यामुळे अनेक बिलियन डॉलर अमेरिकेच्या खजिन्यात जमा झाले झाल्याचं ते म्हणाले आहेत.

पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात शिरला कोरोना; काल परराष्ट्रमंत्री तर आज खुद्द...
चीनच्या वुहान शहरातून जगभर पसरलेल्या विषाणूने सुरुवातीला स्पेन, इटली आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये हाहाकार माजवला होता. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूला चाईनीज विषाणू म्हटलं होतं. या विषाणूचा उगम चीनमध्ये झाल्याने त्याला चाईनीज विषाणू म्हटलं पाहिजे, असंही ट्रम्प म्हणाले होते. दरम्यान, चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले शब्द फिरवले होते. चीनने चांगल्या पद्धतीने कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवलं आहे. चीन विषाणूशी लढण्यासाठी अमेरिकेला मदत करेल, असं ते म्हणाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: china cause big damage to world said donald trump