कंपनीने कर्मचाऱयांना शिक्षा म्हणून लावले रस्त्यावर रांगायला

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

बीजिंगः चीनमधील एका कंपनीने टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना चक्क रस्त्यावर रांगण्याची अमानुष शिक्षा दिली आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

बीजिंगः चीनमधील एका कंपनीने टार्गेट पूर्ण न केल्याबद्दल कर्मचाऱ्यांना चक्क रस्त्यावर रांगण्याची अमानुष शिक्षा दिली आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

साऊथ चाइना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानासुर, कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जनावरांप्रमाणे रस्त्यावर रांगायला लावले. रस्त्यांवर लोकांची आणि वाहनांची वर्दळ असताना कर्मचारी त्यातून मार्ग काढत रांगताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती हातात कंपनीचे नाव असलेला फलक घेऊन सर्वांच्या पुढे चालत आहे. कर्मचाऱ्यांना रस्त्यावर रांगताना पाहून तेथून जाणाऱ्या नागरिकांनाही धक्का बसताना दिसत आहे. रस्त्याच्या कडेला अनेकजण थांबून हे काय चालले आहे, याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा अमानुष प्रकार थांबला आणि कर्मचाऱ्यांची यामधून सुटका झाली. एका कंपनीचा यापूर्वीही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये कर्मचाऱयांना रांगेत उभे करून एक महिला त्यांच्या कानशिलात लगावत होती.

चीनमध्ये यापूर्वी कर्मचाऱयांना पट्ट्याने मारणे, शौचालयात बंदिस्त करणे, घाण पाणी पाजण्याचेही प्रकार घडले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली. पैशांपेक्षा सन्मान महत्वाचा आहे, असे एकाने म्हटले आहे.  कर्मचाऱ्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी ही कंपनी कायमची बंद झाली पाहिजे, असेही एका नेटिझन्सनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China company forces employees to crawl on road as punishment