esakal | चीनच्या फुजियान प्रांतातील शहर लॉकडाऊन; डेल्टा व्हेरियंटची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

Covid-19

चीनच्या फुजियान प्रांतातील शहर लॉकडाऊन; डेल्टा व्हेरियंटची भीती

sakal_logo
By
सुधीर काकडे

जगाला कोरोना (Covid-19) महामारीच्या संकटात ढकलण्यात चीनचा (China) हात असल्याचा आरोप अमेरिकेसह अनेक देशांनी केला. कोरोना महामारीच्या काळात जगातील अनेक देशांत मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. त्यामुळे चीनच्या प्रत्येक हालचालीवर जगाचं लक्ष लागून आहे. त्यातच आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे आढळल्याने खळबळ माजली आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये कुठलाच हलगर्जीपणा न करणाऱ्या चीनने पुन्हा एकदा या शहरात कडक लॉकडाऊन लागु केल्याचे समोर आले आहे.

चीनच्या उत्तर पुर्व भागातील असणाऱ्या फुजियान प्रांतामध्ये असणाऱ्या झियामेन (Xiamen) शहरात कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे काही रुग्ण आढळले आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळ्यानंतर शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या या शहरात पर्यटनासाठी असलेल्या हॉटेल, बार, सिनेमागृह, जीम आणि वाचनालयं बंद करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले असून, यामुळे जगाची चिंता वाढणार आहे.

हेही वाचा: 'पेंग्विन' परग्रहावरुन आलेत?; जाणून घ्या का सुरु आहे चर्चा?

झियामेन शहराव्यतिरीक्त फुजियान प्रांतातील इतर शहरांत डेल्टा व्हेरियंटचे १०३ रुग्ण आढळले आहेत. झियामेन शहरातील एका शाळेतील विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. या विद्यार्थ्याचे पालक काही दिवसांपुर्वी विदेशातून आले होते. त्यांनाही बाधा झाल्याचे आढळले.

loading image
go to top