
नवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यान सीमावादावरून निर्माण झालेला तणाव निवळत चालला असतानाच ड्रॅगनने पुन्हा लडाखच्या हद्दीत घुसखोरी करत दोन वेगळ्या काउंटींची घोषणा केल्याने वाद निर्माण झाला आहे. चीनच्या या चिथावणीखोर कृत्याचा परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध करण्यात आला. ब्रह्मपुत्रा नदीवर देखील चीनकडून उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित अवाढव्य जलविद्युत प्रकल्पाबाबत भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.