दक्षिण चीन समुद्रात चीनचे क्षेपणास्त्र तैनात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

चीनने दक्षिण चीन समुद्रात जहाजविरोधी क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. यासंदर्भातील वृत्त सीएनबीसीने काल दिले आहे. सीएनबीसीच्या एका अहवालानुसार, व्हिएतनाम आणि तैवानसारख्या आशियाई देशांकडून वादग्रस्त ठिकाणांवर दावे केले जात असताना चीनने प्रथमच त्याठिकाणी क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे.

वॉशिंग्टन - चीनने दक्षिण चीन समुद्रात जहाजविरोधी क्षेपणास्त्र तैनात केले आहेत. यासंदर्भातील वृत्त सीएनबीसीने काल दिले आहे. सीएनबीसीच्या एका अहवालानुसार, व्हिएतनाम आणि तैवानसारख्या आशियाई देशांकडून वादग्रस्त ठिकाणांवर दावे केले जात असताना चीनने प्रथमच त्याठिकाणी क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केली आहे. दक्षिण चीन समुद्रातील सैनिकी कारवायाबाबत अमेरिकेचा नेहमीच विरोध राहिला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देण्यास अमेरिकी संरक्षण विभागाने नकार दिला.

गुप्तचर विभागाचा हा विषय असल्याने त्यावर मत व्यक्त करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. क्षेपणास्त्र तैनातीचा उल्लेख न करता वादग्रस्त भागात सैनिकी हालचाली या संरक्षणात्मक असून, आपल्या अधिकार क्षेत्रात चीन कोणताही निर्णय घेऊ शकतो, असे चीनच्या प्रवक्‍त्याने नमूद केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China deploys missiles in South China Sea