esakal | चीनच्या अडचणी वाढल्या; अणू केंद्रातील ९० वैज्ञानिकांनी दिला राजीनामा
sakal

बोलून बातमी शोधा

xi-jinping-.jpg

चीनची सरकारी अणू उर्जा सुरक्षा तंत्रज्ञान संस्था (आईनेस्ट) मध्ये काम करणाऱ्या ९० पेक्षा जास्त वैज्ञानिकांनी राजीनामा दिला आहे.

चीनच्या अडचणी वाढल्या; अणू केंद्रातील ९० वैज्ञानिकांनी दिला राजीनामा

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

बिजिंग- चीनची सरकारी अणू उर्जा सुरक्षा तंत्रज्ञान संस्था (आईनेस्ट) मध्ये काम करणाऱ्या ९० पेक्षा जास्त वैज्ञानिकांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे चीनच्या अडचणी वाढल्या असून यासंबंधी तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने वैज्ञानिकांनी काम सोडल्याने संस्था चालवण्यासाठी खूप कमी वैज्ञानिक शिल्लक राहिले आहेत. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारताची शस्त्रसज्जता! अमेरिकेकडून अत्याधुनिक विमान खरेदीची प्रक्रिया सुरु 
राजीनामा देण्याची अनेक कारणे
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, वैज्ञानिकांनी राजीनामा देण्याची अनेक कारणे आहेत. यात वैज्ञानिकांना मिळणारे वेतन आणि त्यांना मिळणाऱ्या अपूऱ्या सरकारी सुविधा हे प्रमुख कारण आहे. चीन कम्युनिस्ट पक्षाने या संस्थेवर आपला पूर्ण अधिकार दाखवला आहे. पक्षाचे मोठे नेते या वैज्ञानिकांकडून जबरदस्ती काम करुन घेतल असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  

कसा सुरु झाला वाद
चीनची सरकारी संस्था आईनेस्ट हेफी इंस्टिट्यूट ऑफ फिजिकल साईन्स अंतर्गत काम करते. या संस्थेच्या शीर्ष पदावर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांची पकड आहे. त्यामुळे या नेत्यांची या संस्थेवर मनमानी सुरु आहे. शिवाय वैज्ञानिकांना प्रयोगासाठी पुरेसा निधी दिला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संकटातून नफा कमावत आहे गरीब विरोधी सरकार; राहुल गांधींचा बोचरा वार
संस्थेच्या वेबसाईटनुसार, मध्य चीनच्या अनहुई प्रांताची राजधानी हेफेईमधील आईनेस्ट चिनी वैज्ञानिकांचे केंद्र आहे. या संस्थेमध्ये जवळजवळ ६०० सदस्य असून ८० टक्क्यांपेक्षा अधिक वैज्ञानिकांकडे पीएचडीची पदवी आहे. येथील अनेक वैज्ञानिक चीनच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे पदवीधर आहेत. त्यांचे सरासरी वय ३१ वर्षांचे आहे.

एका चिनी अधिकाऱ्यानुसार, कधीकाळी या संस्थेमध्ये जवळजवळ ५०० वैज्ञानिक काम करत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अनेक वैज्ञानिकांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता या संस्थेत केवळ १०० वैज्ञानिकच राहिले आहेत. या वैज्ञानिकांना जवळजवळ १० हजार युआन (१,४३० डॉलर) प्रति महिना वेतन आहे.