China Diplomat Detained, Liu Jianchao Arrest : चीनच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना घडली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, वरिष्ठ चिनी राजदूत लिऊ जियानचाओ यांना जुलैच्या अखेरीस परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर बीजिंगमधील अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. ही कारवाई अशा वेळी झालीये, जेव्हा ते चीनच्या परराष्ट्र धोरणातील (Foreign Policy) सर्वात सक्रिय आणि प्रभावी चेहऱ्यांपैकी एक बनले होते.