
चीनच्या संशोधकांनी वटवाघळांमध्ये नवा कोरोना व्हायरस शोधून काढला आहे. २०१९ मध्ये आलेल्या कोरोना व्हायरसने जगात हाहाकार उडाला होता. आता चीनच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनामुळे खळबळ उडाली आहे. पाच वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधूनच कोरोना जगभरात पसरला होता. यात लाखो लोकांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक महासाथ घोषित केलं होतं. आता नवा कोरोना व्हायरस शोधला आहे तोसुद्धा जनावरांमधून मानवाला होऊ शकतो. कोरोनाचं कारण बनणाऱ्या व्हायरससारखाच हा मानवी रिसेप्टरचा वापर करतो. त्यामुळे आता पुन्हा कोरोनासारखी स्थिती होणार का असा प्रश्न निर्माण होतोय.