China Bangladesh : बांगलादेशच्या पाठीशी आता ‘ड्रॅगन’; युनूस- जिनपिंग द्विपक्षीय चर्चा, चीनकडून आर्थिक सहकार्याची ग्वाही
Xi Jinping Yunus Meeting : बांगलादेशच्या हंगामी सरकारला चीनचा पाठिंबा मिळाला असून, उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीची ग्वाही दिली आहे. बीजिंगमध्ये जिनपिंग-युनूस यांची महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा झाली.
बीजिंग-ढाका : बांगलादेशातील मोहंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकारला आता चीनने पाठिंबा देऊ केला आहे. बांगलादेशास उद्योगक्षेत्रामध्ये मदत करण्याची तयारी चीनने दर्शविली असून काही कारखानेही तिथे उभारण्यात येतील.