Chinese Population | चीनमध्ये मुलांना जन्म देण्यासाठी भीती वाटते? अहवाल आला समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China

चीनमध्ये मुलांना जन्म देण्यासाठी भीती वाटते? अहवाल आला समोर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमधील जन्मदर खूपच घसरला आहे. ग्लोबल टाइम्सने नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार २०२० मध्ये चीनमध्ये मुलांचा जन्मदर १% पेक्षा कमी झाला आहे. हा 43 वर्षांतील सर्वात कमी आहे. ग्लोबल टाइम्सने चीनच्या सरकारी विभाग नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीचा हवाला देत म्हटलं आहे की, 2020 मध्ये, जन्मदर प्रति हजार लोकांमागे 8.52 इतका नोंदवला गेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे संबंधित दर गेल्या 43 वर्षांतील सर्वात कमी आहे.

सर्वात आश्‍चर्यकारक बाब म्हणजे चीनमधील बालकांचा जन्मदर अशावेळी खूपच घसरला आहे. सध्या चीन सरकार मुलांचा जन्मदर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आता चीनच्या लोकसंख्येला तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर चीनच्या कम्युनिस्ट सरकारने मुलांचा जन्मदर वाढवण्यासाठी अनेक योजनाही राबवल्या आहेत. न्यूज १८ ने याची माहिती दिलीय.

चीनसाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे सर्व सरकारी योजनांनंतरही देशातील नैसर्गिक विकास दर 2020 मध्ये 1.45 प्रति हजार इतका खाली आला आहे, जी गेल्या 43 वर्षांतील नीचांकी पातळी आहे. तज्ज्ञांच्या मते, जर हा ट्रेंड असाच चालू राहिला आणि लोकसंख्या कमी झाली तर चीन जगातील सर्वात श्रीमंत देश होण्याआधी म्हातारा होऊ शकतो. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2021 च्या पहिल्या तीन तिमाहीत 58.8 लाख विवाह झाले. जे 2019 च्या तिमाहीपेक्षा 17.5% कमी आहेत.

जन्मदर हा देशाच्या एकूण लोकसंख्येतील नवजात बालकांची संख्या आहे, तर वाढीचा दर जन्मलेल्या मुलांची संख्या आणि जन्मानंतर मुलांचा मृत्यू लक्षात घेऊन तयार केला जातो. चीन सरकारच्या NBS विभागाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये चीनमध्ये जन्मदर प्रति 1000 10.48 होता.

2020 मध्ये नवजात बालकांचे प्रमाण 15 टक्क्यांनी कमी

चीनमध्ये 2020 मध्ये नवजात अर्भकांचे प्रमाण 15% कमी झाले. येथे 2020 मध्ये सुमारे 1.03 कोटी मुलांचा जन्म झाला. 2019 मध्ये ही संख्या 1.17 कोटी होती. या समस्येमुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कारण काम करणाऱ्या लोकांचे वय निवृत्तीच्या जवळ येत आहे. चीनी तरुणांची सतत कमी होत चाललेली संख्या आणि झपाट्याने वाढणाऱ्या वृद्धत्वामुळे सर्वजण आहेत.

या वर्षीच मे महिन्यात बालविकास धोरणात बदलाव

या वर्षी मे महिन्यात चीनने विवाहित जोडप्यांना जास्तीत जास्त 3 मुले जन्माला घालण्याची परवानगी देऊन जुने कुटुंब नियोजन धोरण काढून टाकण्याची घोषणा केली. देशात 4 वर्षांपासून नवजात बालकांच्या संख्येत झालेली घट पाहून हा नियम आणण्यात आला आहे. यापूर्वी 2016 मध्ये चीनने 1970 पासून येथे सुरू असलेल्या वन चाइल्ड पॉलिसीमध्ये बदल केला होता.

loading image
go to top