
Trump Tariffs: अमेरिकेने भारताच्या विरोधात व्यापार युद्ध सुरू करत ५० टक्के टॅरिफ (कर) लावला आहे. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने बुधवारी स्पष्ट केले की ते भारताला एक मजबूत आणि विश्वासार्ह भागीदार मानतात. ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वाँग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांचे सरकार ‘टॅरिफचे समर्थन करत नाही’ आणि खुल्या अर्थव्यवस्थेमध्येच सर्वांची प्रगती आहे. प्रश्न हा आहे की ऑस्ट्रेलिया खरोखर भारतासोबत उभा आहे की चीनच्या धोक्यामुळे आणि क्वाडला वाचवण्यासाठी असे करत आहे.. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.