तीन वर्षांवरील मुलांना लस देणारा चीन पहिला देश

तीन वर्षांवरील मुलांना लस देणारा चीन पहिला देश

चीनमध्ये 03 ते 17 वर्षे वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणासाठी आपतकालीन मान्यता देण्यात आली आहे. लहान मुलांच्या लसीकरणाला मान्यता देणारा चीन पहिला देश आहे. रॉयटर्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. कोरोनाचा उगम चीनमधूनच झालेला आहे. या महामारीनं जगभरात हाहा:कार माजवला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण गरजेचं आहे. प्रत्येक देशात लसीकरण सुरु आहे. 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सध्या सुरु आहे. चीनने मात्र तीन ते 17 या वयोगटातील लहान आणि पौगंडावस्थेतील मुलांना लसीकरणासाठी आपतकालीन मंजुरी दिली आहे. (China first country to approve vaccines for children as young as 3-years-old)

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, सिनोवॅक बायोटेकच्या (Sinovac Biotech's) कोरोना लसीला लहान मुलांच्या वापरासाठी प्रशासनानं परवानगी दिल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांना कंपनीचे अध्यक्ष यिन वेदोंग (Yin Weidong) यांनी दिली. सिनोवॅक बायोटेकने नुकतेच सांगितलं होतं की, तरुणांवर आमची लस प्रभावी ठरत आहे. या लसीचा 3 ते सात वर्ष वयोगटातील मुलांच्या फेज 1 आणि फेज 2 ची क्लिनिकल चाचणीलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

तीन वर्षांवरील मुलांना लस देणारा चीन पहिला देश
लहान मुलांमध्ये आढळतोय MIS-C आजार; पुण्यात आढळले रुग्ण

चीनमध्ये लहान मुलांसाठी तयार होणारी आणखी एक लस लवकरच येणार आहे. येथील कॅनसिनो (CanSino) बायोलॉजिक्स कोरोना प्रतिबंधक लस सध्या क्लिनिकल ट्रायलमध्ये अडकली आहे. सध्या सहा ते 17 या वयोगटातील मुलासांठी या लसीचं फेज 2 च क्लिनिकल ट्रायल सुरु आहे.

तीन वर्षांवरील मुलांना लस देणारा चीन पहिला देश
Corona : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फ्लूची लस द्यावी का?

चीनमध्ये 18 वर्षांवरील वयोगटातील नागरिकां कोरोनाची प्रतिबंधक लस टोचवण्यात आली आहे. चीनमध्ये 3 जूनपर्यंत जवळपास 723 मिलियन डोस देण्यात आले आहेत. चीनमधील तरुण नागरिकांचं लसीकरण अद्याप सुरु आहे. लवकरच सर्वांचं लसीकरण पुर्ण होईल. त्यानंतर पुढील टप्प्यात 3 ते 17 वर्ष या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com