esakal | Coronavirus : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फ्लूची लस द्यावी का?
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination-of-children

Corona : तिसऱ्या लाटेत लहान मुलांना फ्लूची लस द्यावी का?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशावर सध्या कोरोना विषाणूचं ((corona-virus) संकट असून लवकरच या विषाणूची तिसरी लाट येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुले व तरुणांवर होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालक आणि डॉक्टरांमध्ये हा चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांमध्ये लहान मुलांमध्ये कोविडचा संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांचं संरक्षण करायचं असेल तर त्यांना फ्लूची (flu) लस देण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, या कोविड परिस्थितीत लहान मुलांना ही लस देणं सुरक्षित आहे की नाही? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या सीनिअर कन्सल्टन्ट-पीडीअट्रिशियन डॉ. जेसल शेठ यांनी तिसऱ्या लाटेत मुलांना फ्लूची लस देण्याविषयी मार्गदर्शन केलं आहे. (corona-virus-and-flu-symptoms-are-same-but-corona-is-more-dangerous)

इंडियन अकॅडमी ऑफ पीडिअट्रिक्‍सने (आयएपी) ५ वर्षांखालील सर्व मुलांना फ्लूची वार्षिक लस देण्याची शिफारस केली आहे. महामारीच्या काळात यूएसमधील मिशिगन आणि मिसौरीमध्ये हाती घेण्यात आलेल्या कोरोनाबाधित मुलांच्या पाहणीत असे दिसून आले की, २०१९-२० च्या फ्लू सीझनदरम्यान ज्या मुलांना इनअ‍ॅक्टिव्हेटेड इन्फ्लुएन्झा लस देण्यात आली होती त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता काही अंशी कमी झाली. तसेच तीव्र स्वरूपाचा कोविड होण्याचा धोकाही कमी झाला.

हेही वाचा: ६ वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली...

फ्लूची लस कोविडच्या तीव्र लक्षणांपासून मुलांचे कशाप्रकारे संरक्षण करते?

सार्स-कोव्‍ह-२ आणि इन्फ्लुएन्झा यांच्या साथीमध्ये तसेच चिकित्सात्मक वैशिष्ट्यांमध्ये साधर्म्य आहे. सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ च्या समस्येमध्ये इन्फ्लुएन्झाची लागण झाली तर हे महामारी ''ट्विनडेमिक'चे अर्थात जोडसाथीचे रूप धारण करू शकेल; मुलांना फ्लूची लस टोचल्याने होणा-या व्हायरल इंटरफरन्सचा म्हणजे एका आजाराच्या विषाणूच्या संपर्कात आल्याने दुस-या प्रकारच्या विषाणूंविरोधात आपोआप निर्माण होणा-या रोगप्रतिकारशक्तीचा कदाचित त्यांना फायदा होऊ शकेल, संसर्गाच्या धोक्याला प्रतिबंध होऊ शकेल आणि संभाव्य तिस-या लाटेमध्ये लहान मुलांना तीव्र लक्षणे दिसण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल.

शिवाय लसीकरणाच्या माध्यमातून मुलांमध्ये होणा-या इन्फ्लुएन्झाच्या संसर्गाचा प्रतिबंध केल्याने कोविड संसर्गाची चाचणी करून पाहण्याची गरज कमी होईल, त्यातून आरोग्यव्यवस्थेवरील ताण कमी होईल आणि आरोग्यसेवेसाठीच्या संसाधनांवर अधिकचा ताण येणार नाही. म्हणूनच संभाव्य तिस-या लाटेमध्ये कोविड-१९ शी लढा देताना लहान मुलांना इन्फ्लुएन्झाचा प्रतिबंध करणा-या लसीची महत्त्वाची भूमिका असणार आहे अशी शिफारस महाराष्ट्राच्या पीडिएट्रिक टास्क फोर्सने केली आहे.

हेही वाचा: समुद्रात ब्रीज कसे उभारले जातात माहित आहे का?

मुलांना फ्लू आणि कोविड अशा दोन्ही लशी घेता येतील का?

इथे एक महत्त्वाची गोष्ट नोंदवणे आवश्यक आहे, ती म्हणजे फ्लूची लस आणि कोविडची लस या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे लसीच्या २ शॉट्सच्या दरम्यान ४ आठवड्यांचा अवकाश ठेवणे आवश्यक आहे. असे केल्याने लहान मुलांच्या शरीरात अँटीबॉडीज निर्माण व्हायला भरपूर वेळ मिळेल आणि विषाणू संसर्गापासून त्यांना सर्व प्रकारची रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होऊ शकेल.

loading image