esakal | कोरोनात आता नवं संकट! चीनमध्ये Monvkey B विषाणूचा पहिला बळी
sakal

बोलून बातमी शोधा

monkey

कोरोनात आता नवं संकट; चीनमध्ये Monkey B विषाणूचा पहिला बळी!

sakal_logo
By
अमित उजागरे

बीजिंग : कोरोनाच्या संकटकाळात आता चीनमधून आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. चीनमध्ये Monkey B नामक जीवघेणा विषाणू आढळून आला आहे. या विषाणूचा संसर्ग झालेल्या पहिल्या मनुष्याचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. मात्र, या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. ग्लोबल टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. (China first human infection case with Monkey B Virus dies of the virus aau85)

Monkey B विषाणूमुळं मृत्यू झालेली ५३ वर्षीय व्यक्ती पशूवैद्यक म्हणून काम करत होती. या व्यक्तीनं दोन मृत माकडांचं मार्च महिन्यात शवविच्छेदन केलं होतं. दरम्यान, महिन्याभरापूर्वी या व्यक्तीला मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला होता. चीनमधील सीडीसी या जर्नलनं याबाबत शनिवारी माहिती दिली. त्रास होत असल्यानं या प्राण्यांच्या डॉक्टरनं अनेक रुग्णालयांमध्ये उपचार घेतले. पण २७ मे रोजी त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, असं या जर्नलमध्ये म्हटलं आहे. यापूर्वी या Monkey B विषाणूची चीनमध्ये कधीही नोंद झालेली नाही. त्यामुळे या डॉक्टरचं प्रकरणं हे या विषाणूच्या संसर्गाचं पहिलंच प्रकरण मानलं गेलं आहे.

दरम्यान, संशोधकांनी एप्रिल महिन्यात या डॉक्टरच्या शरिरातील सेलेब्रोस्पायनल फ्लुड तपासणीसाठी घेतलं होतं. यामध्ये डॉक्टरच्या शरिरात Monkey B नामक नव्या विषाणूचा शिरकाव झाल्याचं दिसून आलं. पण त्याच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचेही नमुने तपासण्यात आले ते मात्र निगेटिव्ह आले आहेत.

Monkey B हा विषाणू पहिल्यांदा सन १९३२ मध्ये मकाका या देशात आढळून आला होता. थेट संपर्कात आल्यानं या विषाणूमुळे संसर्ग होतो. या विषाणूमुळे मृत्यूचं प्रमाण ७० ते ८० टक्के इतकं आहे. या जर्नलमधून सांगण्यात आलं आहे की, प्राण्यांच्या डॉक्टरांना या विषाणूचा तत्काळ संसर्गाचा धोका आहे.

loading image