
चीनने उत्तर कोरियासोबतची आपली मैत्री निभावत हुकुमशाहा किम जोंग उन आणि त्यांच्या सर्व परिवाराला प्रायोगिक कोरोनावरील लस दिली आहे.
प्योंगयांग- चीनने उत्तर कोरियासोबतची आपली मैत्री निभावत हुकुमशाहा किम जोंग उन आणि त्यांच्या सर्व परिवाराला प्रायोगिक कोरोनावरील लस दिली आहे. अमेरिकेच्या अॅनेलिस्टने आपल्या दोन जपानी इंटेलिजेंस सूत्रांच्या हवाल्याने हा दावा केला आहे. सेंटर फॉर द नॅशनल इंट्रेस्टचे उत्तर कोरियाचे एक्सपर्ट हॅरी काजियानने दावा केलाय की, किम यांच्यासोबत उत्तर कोरियाच्या अनेक अधिकाऱ्यांना कोविड-19 लस देण्यात आली आहे.
हॅरी यांनी सांगितल्यानुसार चीनने आपली प्रायोगिक लशींपेकी एक लस किम जोंग उन यांना दिली आहे. चीनने नेमकी कोणती लस त्यांना दिलीये आणि ती सुरक्षित आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. हॅरी यांनी एका ऑनलाईन आर्टिकलमध्ये दावा केलाय की, किम जोंग उन आणि अनेक उच्च स्तरीय अधिकाऱ्यांना गेल्या दोन-तीन आठवड्याच्या काळात कोरोना लस दिली आहे.
चीनच्या तीन कंपन्या बनवत आहेत लस
अमेरिकेचे मेडिकल साइंटिस्ट पीटर जे होटेज यांनी म्हटलंय की, कमीतकमी तीन कंपन्या कोविड-19 लशींची निर्मिती करत आहेत. ज्यात Sinovac Biotech Ltd, CanSinoBio आणि Sinopharm या कंपन्यांचा समावेश होता. Sinopharm चे म्हणणं आहे की, त्यांची लस चीनमध्ये 10 लाखांच्यापेक्षा अधिक लोकांना देण्यात आली आहे. असे असेल तरी चीनच्या कोणत्याही लशीने तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या लशीबाबत सांशकता कायम आहे.
चिनी बनावटीचे ड्रोन्स पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नवे शस्त्र; इंटेलिजन्स ब्यूरोचा...
दरम्यान, उत्तर कोरियाने आपल्या देशात एकही कोरोना रुग्ण सापडला नसल्याचा दावा केला आहे. पण, दक्षिण कोरियाच्या नॅशनल इंटेलिजेंस सर्व्हिसने सांगितलं की उत्तर कोरियात कोरोना महामारी आहे, पण किम जोंग उन याला नकार देत आहेत. उत्तर कोरिया चीनच्या सीमेला लागून असलेला देश आहे. तसेच उत्तर कोरियाचा चीनसोबत व्यापर सुरु आहे. त्यामुळे तिथे कोरोना पसरला असल्याचा दावा अनेक तज्ज्ञांनी केला आहे. याचमुळे किम जोंग उन आणि त्यांच्या परिवाराने कोरोना लस घेतली असल्याचं सांगण्यात येतंय.