esakal | चिनी बनावटीचे ड्रोन्स पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नवे शस्त्र; इंटेलिजन्स ब्यूरोचा इशारा 
sakal

बोलून बातमी शोधा

drones.

दहशतवादी संघटना आणि आयएसआय यापूर्वी शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी छोट्या ड्रोन्सचा वापर करायचे, पण आता दहशतवादी गट अपग्रेटेड ड्रोन्सचा वापर करु लागले आहेत. 

चिनी बनावटीचे ड्रोन्स पाकिस्तानी दहशतवाद्यांचे नवे शस्त्र; इंटेलिजन्स ब्यूरोचा इशारा 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

इस्लामाबाद- पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गट मोठ्या आकाराचे ड्रोन वापरु लागले आहेत. या माध्यमातून मोठ्या क्षमतेने शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थ पंजाब आणि जम्मू-काश्मीर सीमेवरुन देशात पाठवण्यात येत असल्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती इंटेलिजन्स ब्यूरो अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहशतवादी संघटना आणि आयएसआय यापूर्वी शस्त्रास्त्र आणि अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी छोट्या ड्रोन्सचा वापर करायचे, पण आता दहशतवादी गट अपग्रेटेड ड्रोन्सचा वापर करु लागले आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. पंजाब आणि जम्मू-काश्मीर सीमेवर चीनकडून घेतलेल्या आधुनिक डोन्सच्या माध्यमातून दहशतवादी गट शस्त्रास्त्र पुरवत आहेत. या शस्त्रास्त्रांचा वापर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कृत्य घडवून आणण्यासाठी केला जात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. हिंदुस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

जागतिक एड्स दिन : काय आहे AIDS? जाणून घेऊया लक्षणे, कारणे आणि त्याविषयी सर्वकाही

ताज्या रिपोर्टनुसार सध्याच्या शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत पाकिस्तानमधील खलीस्तानी गट सीमाभागात अतिरेकी हालचाली वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एकट्या पंजाबमध्ये 12 ऑगस्ट 2019 पासून पंजाब पोलिसांनी 4 चिनी बनावटीचे ड्रोन्स पकडले आहेत. या ड्रोन्ससोबत पोलिसांनी शस्त्र जप्त केली आहेत.  

चीनमध्ये बनलेले हे ड्रोन केवळ शस्त्रास्त्रांचाच पुरवठा करत नाहीत, तर सीमा भागात बॉम्ब टाकण्यासाठीही यांचा वापर केला जाऊ शकतो, असा इशारा इंटेलिजन्स ब्यूरोने दिला आहे. तसेच सुरक्षा दलांनी आणि पोलिसांनी सतर्क राहावे यासाठी इंटेलिजन्स ब्यूरोने सतर्क केले आहे. पाकिस्तानची आयएसआय छोट्या ड्रोन्सचा वापर सुरुवातीपासूनच करत आली आहे. आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी गटांनी चीनकडून घेतलेल्या आधुनिक ड्रोन्सचा वापर सुरु केला आहे. इंटेलिजन्स ब्यूरोने दिलेल्या माहितीनुसार, आयएसआयने लश्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या कमांडरसोबत पंजाब प्रांतामध्ये बैठक घेतली होती. 

अभिमानास्पद! इतिहासात प्रथमच बाटाच्या आंतरराष्ट्रीय CEO पदी भारतीय व्यक्ती

भारत अँटी ड्रोन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. हिवाळ्याचे दोन महिने भारतीय सुरक्षा दलांसाठी आव्हानाचे असणार आहेत. सीमा सुरक्षा दलाचे जनरल राकेश अस्थाना यांनी दिलेल्या माहितीनुसार 20 जून रोजी एक ड्रोन पाडण्यात आले होते. हे ड्रोन मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्र घेऊन जात होते. भविष्यातील अशा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी लष्कराकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच यासाठी अँटी ड्रोन सिस्टिम तैनात केली जात आहे. 


 

loading image