चीन सगळ्यात आधी सैनिकांना देतोय कोरोना लस!

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 11 August 2020

जगभरातील देश कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे दक्षिण चीन ते लडाखपर्यंत आपली दादागिरी दाखवणाऱ्या चीनने सर्वात आधी आपल्या सैनिकांना लस देण्यास सुरु केले आहे.

बिजिंग- जगभरातील देश कोरोना लस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचा विचार करत आहेत. दुसरीकडे दक्षिण चीन ते लडाखपर्यंत आपली दादागिरी दाखवणाऱ्या चीनने सर्वात आधी आपल्या सैनिकांना लस देण्यास सुरु केले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मदतीने तयार करण्यात आलेली कोरोना लस मोठ्या प्रमाणात सैनिकांना देण्यात येत आहे. चीनमधील दोन लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. चाचणी पूर्ण होण्याआधीच चीनने आपल्या सैनिकांना लस देणे सुरु केले आहे. 'नवभारत टाईम्स'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

100 दिवसांत एकही कोरोना रुग्ण न सापडलेल्या न्यूझीलंडमधून आली धक्कादायक बातमी

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी सैन्य आणि नागरिकांना एकत्र आणण्याचे अभियान सुरु केले आहे. कोरोना विषाणूमुळे या अभियानाला गती आली आहे. केनबरातील चायना पॉलिसी सेंटरचे डायरेक्टर एडम म्हणाले की, चिनी सैन्यामध्ये जैविक आणि संक्रमित आजारांविरोधात लढण्याची क्षमता आहे. चीन याचा पुरेपुर फायदा घेत आहे.  

cansion ची कोरोना विषाणू लस चिनी सैन्यासोबत मिळवून तयार करण्यात आली आहे. cansion कंपनीने चाचणी आणि लस निर्माण करण्याच्या क्षमतेमध्ये अमेरिकेची मॉडर्ना, फाईजर, क्रोरवैक आणि अस्त्राजेनेका या उमेदवारांना खूप मागे टाकले आहे. चिनी सैन्याच्या मेडिकल साईन्सचे प्रमुख चेन वेई यांनी cansion च्या लस निर्मितीमध्ये मुख्य भूमिका बजावली आहे. 

चीनमधील माध्यमांनुसार लस विकसित केल्याने डॉक्टर चेन वेई यांचे मोठे कौतुक होत आहे. असे असले तरी लस निर्मितीमध्ये  डॉक्‍टर चेन वेई यांची अधिकारिक कोणतीही भूमिका नाहीये. चेन यांनी यापूर्वी cansion कंपनीसाठी इबोलासाठी लस बनवली होती. चीनमध्ये cansion कंपनीच्या लसीशिवाय अनेक उमेदवारांना कोरोना लस निर्मितीत यश मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या चीनमध्ये 8 लसींवर काम सुरु आहे. चिनी सैन्य आणखी एक लस तयार करण्यासाठी मदत करत आहे. 

पहिली लस रशियाचीच; पुतीन यांची घोषणा, मुलीलाही दिली लस

चीनशिवाय दुसरा कोणताही देश आपल्या सैनिकांना कोरोनाची लस देत नाहीये. चीन आपल्या सैनिकांना लस देऊन दुष्प्रचार करत असल्याचं एडम यांनी सांगितलं. चिनी सैन्य देशासाठी बलिदान देऊ शकतात हे चीनला दाखवायचे आहे. शिवाय लस प्रभावी ठरली नाही, तर याची माहिती कोणाला मिळणार नाही यासाठी चीन प्रयत्न करत आहे. 

दरम्यान,  जगातील सर्वात पहिली कोरोना लस तयार करण्यात रशियाला यश मिळालं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी स्वत: याबाबतची घोषणा केली आहे. अमेरिका, ब्रिटेन, इस्त्राईल, जपान आणि भारतामध्ये कोरोना लसीच्या चाचण्या सुरु आहेत. जगभरातील 5 उमेदवार लस निर्मितीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनी दिली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China is giving Covid-19 vaccine to soldiers